ETV Bharat / sports

शेवटच्या सामन्यात मासाकाद्झा चमकला, झिम्बाब्वेची अफगाणिस्तानवर मात

author img

By

Published : Sep 21, 2019, 10:46 AM IST

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रहमनुल्लहा गुरबाजच्या ६१ आणि हजरतुल्लाह झझाईच्या ३१ धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून मपोफुने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

शेवटच्या सामन्यात मासाकाद्झा चमकला, झिम्बाब्वेची अफगाणिस्तानवर मात

नवी दिल्ली - आपल्या शेवटच्या सामन्यात हॅमिल्टन मासाकाद्झाने केलेल्या ७१ धावांच्या तुफानी खेळीमुळे झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर ७ गडी राखून मात केली आहे. त्यामुळे झिम्बाब्वेच्या संघाने मासाकाद्झाला विजयी निरोप दिला आहे.

हेही वाचा - विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप : फायनलमध्ये प्रवेश करणारा अमित पांघल ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रहमनुल्लहा गुरबाजच्या ६१ आणि हजरतुल्लाह झझाईच्या ३१ धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून मपोफुने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

१५६ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाने तीन गडी गमावले. मात्र हे आव्हान १९.३ षटकांतच पूर्ण केले. हॅमिल्टन मासाकाद्झाने ४२ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांसह ७१ धावा केल्या. मासाकाद्झाने आपला शेवटचा टी-२० सामना खेळताना १८ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला त्याने रामराम ठोकला आहे.

मासाकाद्झाने रेगिस चाकाब्वासोबत ७० धावांची भागीदारी रचली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानला दोन आणि दौलत झादरानला एक बळी मिळवता आला. राशिद खानने आपल्या ४ षटकात २९ धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Intro:Body:

शेवटच्या सामन्यात मासाकाद्झा चमकला, झिम्बाब्वेची अफगाणिस्तानवर मात

नवी दिल्ली - आपल्या शेवटच्या सामन्यात हॅमिल्टन मासाकाद्झाने केलेल्या ७१ धावांच्या तुफानी खेळीमुळे झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर ७ गडी राखून मात केली आहे. त्यामुळे झिम्बाब्वेच्या संघाने मासाकाद्झाला विजयी निरोप दिला आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रहमनुल्लहा गुरबाजच्या ६१ आणि हजरतुल्लाह झझाईच्या ३१ धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून मपोफुने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. 

१५६ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाने तीन गडी गमावले. मात्र हे आव्हान १९.३ षटकांतच पूर्ण केले. हॅमिल्टन मासाकाद्झाने ४२ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांसह ७१ धावा केल्या. मासाकाद्झाने आपला शेवटचा टी-२० सामना खेळताना १८ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला त्याने रामराम ठोकला आहे. 

मासाकाद्झाने रेगिस चाकाब्वासोबत ७० धावांची भागीदारी रचली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानला दोन  आणि दौलत झादरानला एक बळी मिळवता आला. राशिद खानने आपल्या ४ षटकात २९ धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.