ETV Bharat / sports

IND VS ENG : जो रूट इंग्लंडचा यशस्वी कर्णधार

author img

By

Published : Feb 9, 2021, 4:08 PM IST

जो रुटने आतापर्यंत ४७ कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. यात त्याने इंग्लंड संघाला २६ कसोटीत विजय मिळवून दिले आहेत. जो रुटसह या यादीत मायकल वॉन पहिल्या स्थानी आहे. वॉन याने ५१ कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना, २६ कसोटी सामन्यात विजय मिळवून दिले होते.

root-became-the-most-successful-english-captain
IND VS ENG : जो रूट इंग्लंडचा यशस्वी कर्णधार

चेन्नई - जो रुटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंड संघाने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा २२७ धावांनी पराभव केला आणि ४ सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या दरम्यान, जो रुटने एका विक्रमाशी बरोबरी साधली आहे. रूट कर्णधार या नात्याने, इंग्लंड संघाला सर्वाधिक कसोटी सामने जिंकून देणारा संयुक्तीक पहिला कर्णधार ठरला आहे.

जो रुटने आतापर्यंत ४७ कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. यात त्याने इंग्लंड संघाला २६ कसोटीत विजय मिळवून दिले आहेत. जो रुटसह या यादीत मायकल वॉन पहिल्या स्थानी आहे. वॉन याने ५१ कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना, २६ कसोटी सामन्यात विजय मिळवून दिले होते.

या यादीत अँड्र्यू स्ट्रॉस याचे देखील नाव आहे. त्याने ५० कसोटीत २४, अ‌ॅलिस्टर कुकने ५९ सामन्यात २४ तर पीटरने ४१ सामन्यात २० विजय इंग्लंडला मिळवून दिले.

रुटच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने आशिया खंडात ६ कसोटी सामने खेळली आहेत. यात इंग्लंडने सहाच्या सहा सामन्यात विजय मिळवला आहे. यातील पाच सामने श्रीलंकाविरुद्ध झाली आहेत. तर भारताविरुद्ध एक सामना आहे.

इंग्लंडने असा जिंकला सामना...

जॅक लीच आणि जेम्स अँडरसनच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला सर्वबाद करत पहिल्या कसोटीत मोठा विजय नोंदवला आहे. इंग्लडने भारताला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारतीय संघ दुसऱ्या डावात १९२ धावाच करू शकला. त्यामुळे इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी विजय नोंदवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. पहिल्या डावात द्विशकी खेळी साकारणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा - Ind vs Eng : जेम्स अँडरसनचा 'तो' भन्नाट स्पेल अन् भारताच्या पराभवाची झाली पायाभरणी

हेही वाचा - WTC : इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप, भारतीय संघाची मोठी घसरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.