ETV Bharat / sports

IND vs WI : 'हिटमॅन'कडून २२ वर्षापूर्वीचा विक्रम सर

author img

By

Published : Dec 22, 2019, 7:34 PM IST

बाराबती स्टेडियमवर फलंदाजीला उतरलेल्या रोहितने ९ धावा करताच वर्षातील २३८८ धावा पूर्ण केल्या. सनथ जयसुर्याने १९९७ मध्ये, सलामीवीर म्हणून एका वर्षांत सर्वाधिक २३८७ धावा केल्या होत्या.

Rohit Sharma surpasses Sanath Jayasuriya as the leading run scorer in a calendar year
IND vs WI : 'हिटमॅन'कडून २२ वर्षापूर्वीचा विक्रम सर

कटक - भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. कटक येथे सुरू असलेल्या विंडीजविरूद्धच्या सामन्यात रोहितने तब्बल २२ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. सलामीवीर म्हणून एका वर्षांत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात हिटमॅनने लंकेचा दिग्गज माजी फलंदाज सनथ जयसूर्याला पछा़डले आहे.

हेही वाचा - इंग्लंडच्या विश्वकरंडक विजेत्या फुटबॉल संघाचे सदस्य मार्टिन पीटर्स यांचे निधन

बाराबती स्टेडियमवर फलंदाजीला उतरलेल्या रोहितने ९ धावा करताच वर्षातील २३८८ धावा पूर्ण केल्या. सनथ जयसुर्याने १९९७ मध्ये, सलामीवीर म्हणून एका वर्षांत सर्वाधिक २३८७ धावा केल्या होत्या. तर, या सामन्यापूर्वी रोहितने २०१९ या वर्षात एकदिवसीय सामन्यात १४२७, टी-२० त ३९६ आणि कसोटीत ५५६ धावा केल्या होत्या.

भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. विंडीजने पहिला सामना तर भारताने दुसरा सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक सामना आज कटकच्या मैदानात खेळवला जात आहे.

Intro:Body:

IND vs WI : 'हिटमॅन'कडून २२ वर्षापूर्वीचा विक्रम सर

कटक - भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. कटक येथे सुरू असलेल्या विंडीजविरूद्धच्या सामन्यात रोहितने तब्बल २२ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. सलामीवीर म्हणून एका वर्षांत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात हिटमॅनने लंकेचा दिग्गज माजी फलंदाज सनथ जयसूर्याला पछा़डले आहे.

हेही वाचा -

बाराबती स्टेडियमवर फलंदाजीला उतरलेल्या रोहितने ९ धावा करताच वर्षातील २३८८ धावा पूर्ण केल्या. सनथ जयसुर्याने १९९७ मध्ये, सलामीवीर म्हणून एका वर्षांत सर्वाधिक २३८७ धावा केल्या होत्या. तर, या सामन्यापूर्वी रोहितने २०१९ या वर्षात एकदिवसीय सामन्यात १४२७, टी-२० त ३९६ आणि कसोटीत ५५६ धावा केल्या होत्या.

भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. विंडीजने पहिला सामना तर भारताने दुसरा सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक सामना आज कटकच्या मैदानात खेळवला जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.