ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिकॉकला मिळाला मोठा सन्मान

author img

By

Published : Jul 5, 2020, 3:09 PM IST

यष्टीरक्षक फलंदाज डिकॉकला दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. 2017 मध्येही त्याने हे कामगिरी केली होती. यंदाचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणूनही डिकॉकला निवडले गेले आहे.

Quinton de kock  and laura wolvaardt became south african cricketer of the Year
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिकॉकला मिळाला मोठा सन्मान

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा कर्णधार क्विंटन डिकॉक याला क्रिकेट दक्षिण आफ्रिकाच्या (सीएसए)वार्षिक पुरस्कार सोहळ्यात यंदाचा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. हा सोहळा ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता.

यष्टीरक्षक फलंदाज डिकॉकला दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. 2017 मध्येही त्याने हे कामगिरी केली होती. यंदाचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणूनही डिकॉकला निवडले गेले आहे.

युवा महिला सलामीवीर लॉरा वोल्फार्टला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू आणि वर्षाची सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार प्राप्त झाला.

Quinton de kock  and laura wolvaardt became south african cricketer of the Year
क्विंटन डिकॉक आणि लॉरा वोल्फार्ट

वेगवान गोलंदाज लुंगी एनगीडीला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आंतरराष्ट्रीय व टी-20 पुरुष खेळाडू म्हणून निवडले गेले. डेव्हिड मिलरला 'चाहत्यांचा आवडता खेळाडू' हा पुरस्कार मिळाला. भारताविरूद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करणारा आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या डावात पाच बळी घेणारा एनरिच नॉर्टजे हा वर्षाचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष नवखा खेळाडू म्हणून निवडला गेला.

शबनिम इस्माईल हिला यंदाची सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू आणि फिरकीपटू नोनकुलुलेको मलाबाला सर्वोत्कृष्ट महिला नवखी खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

सीएसएचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक फाउल म्हणाले, "डिकॉक हा क्रिकेटच्या दोन्ही प्रकारातील अव्वल यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून तो उदयास येत आहे.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.