ETV Bharat / sports

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची झिम्बाब्वेवर सरशी

author img

By

Published : Nov 2, 2020, 3:57 PM IST

विल्यम्सने ७० चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक झळकावले. त्याच्या व्यतिरिक्त झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने ३६, ब्रायन चारीने २५ धावा केल्या. पाकिस्तानने २०७ धावांचे सोपे आव्हान ३५.२ षटकांत चार गडी गमावून गाठले.

Pakistan beat zimbabwe by 6 wickets in rawalpindi odi
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची झिम्बाब्वेवर सरशी

रावळपिंडी - रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेला सहा गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करणार्‍या झिम्बाब्वेचा डाव ४५.१ षटकांत २०६ धावांत आटोपला. सीन विल्यम्सने त्यांच्यासाठी ७५ धावा केल्या.

विल्यम्सने ७० चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक झळकावले. त्याच्या व्यतिरिक्त झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने ३६, ब्रायन चारीने २५ धावा केल्या. पाकिस्तानने २०७ धावांचे सोपे आव्हान ३५.२ षटकांत चार गडी गमावून गाठले.

इमाम उल हक (४९) आणि अबिद अली (२२) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. यानंतर कर्णधार बाबर आझमने ७४ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावा फटकावून संघाचा विजय निश्चित केला. या सर्वांव्यतिरिक्त हैदर अलीने २९ धावा केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.