ETV Bharat / sports

NZ VS SL T-20: किंवीचा संघ जाहीर, केन विल्यमसन याला विश्रांती, साऊदीकडे नेतृत्व

author img

By

Published : Aug 20, 2019, 12:21 PM IST

न्यूझीलंड निवड समितीने सांगितले की, 'केन विल्यमसन आणि ट्रेंट बोल्ट यांनी विश्वकरंडक स्पर्धेत संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांना आता पुरेशी विश्रांती मिळण्याची आवश्यकता आहे. यामुळे निवड समितीने श्रीलंकेविरुध्द होणाऱ्या टी-२० मालिकेत त्यांनी विश्रांती दिली आहे.'

NZ VS SL T-20: किंवीचा संघ जाहीर, केन विल्यमसन याला विश्रांती, साऊदीकडे नेतृत्व

कोलंबो - न्यूझीलंडने श्रीलंका दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी कर्णधार केन विल्यमसनला विश्रांती दिली असून त्याच्या ठिकाणी संघाचे नेतृत्व टीम साऊदीकडे दिले आहे. तसेच अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टलाही विश्रांती देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम सेइफर्ट हा दुखापतीतून सावरला असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.

न्यूझीलंड निवड समितीने सांगितले की, 'केन आणि ट्रेंट यांनी विश्वकरंडक स्पर्धेत संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांना आता पुरेशी विश्रांती मिळण्याची आवश्यकता आहे. यामुळे निवड समितीने श्रीलंकेविरुध्द होणाऱ्या टी-२० मालिकेत त्यांनी विश्रांती दिली आहे.'

विश्वकरंडक स्पर्धेमध्ये यष्टिरक्षक- फलंदाज सेइफर्ट याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेला मुकला होता. आता तो यातून बरा झाला असून त्याला या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. शिवाय मिचेल सँटनर, टोड अॅस्टेल आणि इश सोधी या तीन फिरकीपटूंना संधी निवड समितीने दिली आहे.

न्यूझीलंडचा संघ -
टीम साऊदी (कर्णधार) , कॉलीन डी ग्रँडहोम, टॉड अॅस्टल, टॉम ब्रुस, ल्युकी फर्ग्युसन, टीम सेइफर्ट (यष्टीरक्षक), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेईंज, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, सेथ रँस, मिचेल सँटनर, इश सोधी, रॉस टेलर.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.