ETV Bharat / sports

IND vs ENG : 'या' तीन खेळाडूंपासून सावध राहा; दिग्गजाचा इंग्लंडला सल्ला

author img

By

Published : Feb 2, 2021, 8:15 PM IST

रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे मत इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू माँटी पानेसर याने व्यक्त केले आहे.

No mention of Virat Kohli as Monty Panesar picks India's 3 key players for England Test series
IND vs ENG : 'या' तीन खेळाडूंपासून सावध राहा; दिग्गजाचा इंग्लंडला सल्ला

मुंबई - भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह इंग्लंडसाठी धोकादायक नाहीत. तर रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे तिघे इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे मत इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू माँटी पानेसर याने व्यक्त केले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याआधी पानेसर म्हणाला की, 'अजिंक्य रहाणेची फलंदाजी आणि नेतृत्व कौशल्य पाहून मी प्रभावीत झालो आहे. तसेच चेतेश्वर पुजारा प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यात सक्षम आहे. याशिवाय रविचंद्रन अश्विन दोन्ही बाजूने गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता तर आहेत यासोबत तो एक चतूर गोलंदाज आहे.'

जो रूट, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांच्या कामगिरीवर इंग्लंड संघाचे अस्तित्व राहणार आहे. जो रुट सध्या फॉर्मात आहे. त्याला अ‌ॅलिस्टर कुकप्रमाणेच कामगिरी करावी लागेल. रूटला भारतीय खेळपट्यावर नांगर टाकावा लागेल, असे देखील पानेसर म्हणाला. दरम्यान, उभय संघातील पहिले दोन सामने चेन्नई येथे तर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मैदानावर होणार आहेत.

हेही वाचा - बिग बॅश लीग २०२१ : अंतिम सामन्यासाठी प्रेक्षक क्षमता वाढवली

हेही वाचा - ICC World Test Championship: सोप्या शब्दात जाणून घ्या, कोणता संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अंतिम सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.