ETV Bharat / sports

तब्बल पाच वर्षानंतर 'या' दोन देशात रंगणार कसोटी क्रिकेट

author img

By

Published : Jan 25, 2021, 5:45 PM IST

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे या दौर्‍याची अधिकृतपणे पुष्टी केली. २०१५ नंतर प्रथमच न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २०१५ मध्ये दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. ही मालिका १-१ अशी बरोबरी सुटली.

New Zealand will visit England after five years, will play two Test matches
तब्बल पाच वर्षानंतर 'या' दोन देशात रंगणार कसोटी क्रिकेट

नवी दिल्ली - तब्बल पाच वर्षानंतर न्यूझीलंडचा क्रिकेट संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यंदाच्या वर्षातील जून महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर तर दुसरा सामना एजबस्टन येथे खेळवण्यात येईल.

हेही वाचा - कर्णधार जो रूटचा इंग्लंडसाठी भीमपराक्रम

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे या दौर्‍याची अधिकृतपणे पुष्टी केली. २०१५ नंतर प्रथमच न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २०१५ मध्ये दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. ही मालिका १-१ अशी बरोबरी सुटली.

यंदाच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशांचे चाहते आतूर असणार आहेत. कारण एकीकडे केन विल्यम्सनचा न्यूझीलंड तर दुसरीकडे जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ एकमेकांसमोर उभा ठाकणार आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १०५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडने ४८ आणि न्यूझीलंडने केवळ ११ वेळा विजय मिळवला आहे. दोन्ही संघामध्ये ४६ सामने बरोबरीत सुटले आहेत.

न्यूझीलंडचा इंग्लंड दौरा -

  • पहिला कसोटी सामना - २ ते ६ जून, लॉर्ड्स.
  • दुसरा कसोटी सामना - १० ते १४ जून, एजबस्टन.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.