ETV Bharat / sports

“जेव्हा धोनी रागावला होता...”, कुलदीपने सांगितला ‘त्या’ सामन्याचा किस्सा

author img

By

Published : Apr 17, 2020, 7:56 PM IST

कुलदीपने २०१७ मध्ये कानपूर येथे लंकेविरूद्ध झालेल्या टी-२० सामन्याची आठवण काढली आहे. कुलदीप म्हणाला, “कुशल परेराने कव्हर्सच्या वरून मला चौकार ठोकला. त्यानंतर धोनीने मला ओरडत क्षेत्ररक्षण बदलण्यास सांगितले होते. मात्र, मी त्याचा सल्ला ऐकला नाही. पुढच्याच चेंडूवर कुशलने रिव्हर्स स्वीपवर मला चौकार मारला. त्यानंतर संतापलेला धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी भारतासाठी ३०० एकदिवसीय सामने खेळलो आहे. मी स्पष्टीकरण द्यायला वेडा आहे का?”

Ms dhoni has not been angry for 20 years said kuldeep Yadav
“जेव्हा धोनी रागावला होता...”, कुलदीपने सांगितला ‘त्या’ सामन्याचा किस्सा

नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या शांत वृत्तीसाठी ओळखला जातो. मात्र, फिरकीपटू आणि चायनामन कुलदीप यादवने धोनीविषयी एका प्रसंगाची आठवण काढली आहे. ज्यात कुलदीप धोनीच्या रागामुळे खूप घाबरला होता.

कुलदीपने २०१७मध्ये कानपूर येथे लंकेविरूद्ध झालेल्या टी-२० सामन्याची आठवण काढली आहे. कुलदीप म्हणाला, “कुशल परेराने कव्हर्सच्या वरून मला चौकार ठोकला. त्यानंतर धोनीने मला ओरडत क्षेत्ररक्षण बदलण्यास सांगितले होते. मात्र, मी त्याचा सल्ला ऐकला नाही. पुढच्याच चेंडूवर कुशलने रिव्हर्स स्वीपवर मला चौकार मारला. त्यानंतर संतापलेला धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी भारतासाठी ३०० एकदिवसीय सामने खेळलो आहे. मी स्पष्टीकरण द्यायला वेडा आहे का?”

या सामन्यानंतर कुलदीपने धोनीला रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा धोनीने त्याला चांगले प्रदर्शन करावे यासाठी रागावलो असल्याचे सांगितले होते. कुलदीप म्हणाला, “त्यादिवशी मला खूप भीती वाटली. सामन्यानंतर मी टीम बसमध्ये प्रवास करत असताना धोनीकडे गेलो आणि त्याला विचारले, की तुला कधी राग येतो. तेव्हा धोनी म्हणाला, “मी २० वर्षांपासून रागावलेलो नाही.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.