ETV Bharat / sports

क्रिकेटपटू अजिंक्य राहणेच्या हस्ते शेळीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाचे लॉन्चिंग

author img

By

Published : Nov 4, 2019, 5:17 AM IST

अजिंक्य राहणेच्या हस्ते शेळीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाचे लॉन्चिंग

शेतकऱ्यांकडुन दररोज प्रति लीटर तीनशे रुपये दराने 100 लीटर दूध घेतले जाते. या दुधापासून तीन प्रकारचे वेगवेगळे साबण बनवले जातात. 'शिवार' याच ब्रँडच्या नावाखाली हा साबण बाजारात विकला जात आहे. कॅलेंड्युला पेटल्स, शे बटर अँड सिनॅमोन आणि हिमालयन चारकोल अँड डेड सी मड क्ले अशा तीन प्रकारांत हा साबण उपलब्ध आहे.

उस्मानाबाद - जिल्ह्यात शेळीच्या दुधापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिवार साबण बनवण्यात आला आहे. या साबणाचे लॉन्चिंग टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणेच्या हस्ते करण्यात आले. पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला जेष्ठ समालोचक सुनंदन लेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अजिंक्य राहणेच्या हस्ते शेळीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाचे लॉन्चिंग

उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. या आत्महत्या रोखण्यासाठी शिवार संसद एक युवा चळवळ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. शेळीच्या दुधापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिवार साबण बनवण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अडीचशे कुटुंबीयांना रोजगार मिळाला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणेने संवेदनशील राहून काम करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांकडुन दररोज प्रति लीटर तीनशे रुपये दराने 100 लीटर दूध घेतले जाते. या दुधापासून तीन प्रकारचे वेगवेगळे साबण बनवले जातात. 'शिवार' याच ब्रँडच्या नावाखाली हा साबण बाजारात विकला जात आहे. कॅलेंड्युला पेटल्स, शे बटर अँड सिनॅमोन आणि हिमालयन चारकोल अँड डेड सी मड क्ले अशा तीन प्रकारांत हा साबण उपलब्ध आहे. 100 ग्रॅम साबणाची किंमत दीडशे रुपये आहे. क्रिकेटपटू अजिंक्य राहणे, केदार जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांचा या उपक्रमात सहभाग आहे. हा साबण शेळीच्या दुधापासून बनवला आला असुन रसायनविरहित, कृतिम रंगविरहित नैसर्गिक स्वरूपाचा आहे. शिवार संसदने या साबणाचे पेटंटही मिळवले आहे.

Intro:उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. या आत्महत्या रोखण्यासाठी शिवार संसद एक युवा चळवळ यांनी पुढाकार घेतलाय. उस्मानाबादेत शेळीच्या दुधापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिवार साबण बनवण्यात आलाय. कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे यांच्या हस्ते या साबणाचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी जेष्ठ समालोचक सुनंदन लेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभाग्रहात हा सोहळा पार पडला. क्रिकेटपटू अजिंक्य राहणे, केदार जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांचा या उपक्रमात सहभाग आहे.


या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अडीचशे कुटुंबीयांना रोजगार मिळालाय. दररोज प्रति लिटर तीनशे रुपये दरानं 100 लिटर दूध घेतलं जातं. या दुधापासून तीन प्रकारचे वेगवेगळे साबण बनवले जातात. शिवार याच ब्रँडनेमखाली हा साबण बाजारात विकला जातो. कॅलेंड्युला पेटल्स, शे बटर अँड सिनॅमोन आणि हिमालयन चारकोल अँड डेड सी मड क्ले अशा तीन हा साबण उपलब्ध आहे. 100 ग्रॅम साबणाची किंमत दीडशे रुपये आहे.

हा साबण शेळीच्या दुधापासून बनवलाय
रसायनविरहित, कृतिम रंगविरहित नैसर्गिक स्वरूपाचा हा साबण आहे. शिवार संसदने हे या साबणाचे पेटंटही मिळवले आहे.Body:...Conclusion:....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.