ETV Bharat / sports

मलिंगा आयपीएलच्या पहिल्या आठवड्याला मुकण्याची शक्यता

author img

By

Published : Aug 22, 2020, 10:43 AM IST

३६ वर्षीय मलिंगाच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्याने तो युएईला पोहोचू शकला नाही. मलिंगाच्या वडिलांची पुढील काही आठवड्यात शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे या क्षणी त्याचे यूएईला जाणे अवघड आहे. कोलंबोमध्ये प्रशिक्षण घेत असताना मलिंगाला वडिलांसोबत थांबायचे आहे.

lasith malinga to miss first week of ipl 2020
मलिंगा आयपीएलच्या पहिल्या आठवड्याला मुकण्याची शक्यता

मुंबई - श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएलच्या पहिल्या आठवड्याला मुकण्याची शक्यता आहे. मलिंगा हा मुंबई इंडियन्सचा महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहवर वेगवान गोलंदाजीची कमान सोपवली जाणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत होणार आहे.

३६ वर्षीय मलिंगाच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्याने तो युएईला पोहोचू शकला नाही. मलिंगाच्या वडिलांची पुढील काही आठवड्यात शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे या क्षणी त्याचे यूएईला जाणे अवघड आहे. कोलंबोमध्ये प्रशिक्षण घेत असताना मलिंगाला वडिलांसोबत थांबायचे आहे.

श्रीलंका आणि मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणारा मलिंगा पुढील आठवड्यात ३७ वर्षांचा होईल. यावर्षी मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने श्रीलंकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर, वर्षभरापूर्वी, त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. अलीकडच्या काळात तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे तो जून आणि जुलैमध्ये श्रीलंका क्रिकेटच्या शिबिरातही तो भाग घेऊ शकला नाही. आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सचा संघ युएईला दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.