ETV Bharat / sports

IND vs ENG: बुमराहची चौथ्या कसोटीतून माघार, जाणून घ्या कारण

author img

By

Published : Feb 27, 2021, 3:05 PM IST

Jasprit Bumrah will miss the fourth Test against England due to personal reasons, BCCI confirmed.
IND vs ENG: बुमराहची चौथ्या कसोटीतून माघार, जाणून घ्या कारण

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. बुमराहने वैयक्तिक कारणाने या कसोटीतून माघार घेतली आहे. याबात त्याने बीसीसीआयला चौथ्या कसोटीत न खेळविण्याची विनंती केली होती. त्याची विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे. बीसीसीआयने त्याला अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून मुक्त केले आहे.

अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ४ मार्च ते ८ मार्च या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यातून बाहेर पडला आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. बुमराहने वैयक्तिक कारणाने या कसोटीतून माघार घेतली आहे. याबात त्याने बीसीसीआयला चौथ्या कसोटीत न खेळविण्याची विनंती केली होती. त्याची विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे. बीसीसीआयने त्याला अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून मुक्त केले आहे.

दरम्यान, बुमराहच्या बाहेर जाण्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजीचा भार अनुभवी इशांत शर्माबरोबर कोणाच्या खांद्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या भारतीय कसोटी संघामध्ये मोहम्मद सिराज, उमेश यादव व इशांत शर्मा हे तीनच वेगवान गोलंदाज आहेत. इशांतबरोबर सिराजला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या निकालावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे. भारतीय संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यास भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना अनिर्णीत किंवा जिंकावा लागेल.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन , कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.