ETV Bharat / sports

रविचंद्रन अश्विन आयपीएल २०२० हंगामात 'या' संघाकडून खेळणार...?

author img

By

Published : Sep 4, 2019, 5:18 PM IST

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीचा संघ अश्विनला पंजाब संघाबरोबर ऑलकॅश डील करुन संघात सामील करुन घेणार आहेत. दरम्यान, २०१८ च्या आयपीएल लिलावामध्ये पंजाबने रविचंद्रन अश्विन याला ७.६ कोटी रुपयाची बोली लावून संघात सामील करुन घेतले होते. तसेच पंजाबने अश्विनकडे कर्णधारपदाची जबाबदारीही दिली होती. संघाला या मोसमातही विजेतेपद पटकावता आले नाही. यानंतर अश्विनला संघाबाहेर काढण्यात येणार अशी चर्चा रंगली होती.

रविचंद्रन अश्विन आयपीएल २०२० हंगामात या संघाकडून खेळणार...?

नवी दिल्ली - भारतीय फिरकीपटू, किंग्ज इलेव्हन पंजाबचा २०१८ आणि २०१९ या हंगामातील कर्णधार रविचंद्रन अश्विन आगामी २०२० च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पंजाब संघ अश्विनला संघातून बाहेर काढण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा सुरू होती. पण, आता इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तनुसार अश्विनला पंजाबने बाहेर केल्यास, दिल्ली संघ त्याला खरेदी करण्यास उत्सुक आहे. दिल्लीपूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या संघानेही अश्विनबद्दल आपली आवड दर्शविली होती, परंतु त्यानंतर काही कारणांमुळे ही गोष्ट पुढे जाऊ शकली नाही.

फिरकीपटू अश्विन पत्नीला म्हणतो, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.'

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली संघ अश्विनला पंजाब संघाबरोबर ऑलकॅश डील करुन संघात सामील करुन घेणार आहेत. दरम्यान, २०१८ च्या आयपीएल लिलावमध्ये पंजाबने अश्विनला ७.६ कोटी रुपयाची बोली लावून संघात सामिल करुन घेतले होते. तसेच पंजाबने अश्विनकडे कर्णधारपदाची जबाबदारीही दिली होती. संघाला या मोसमातही विजेतेपद पटकावता आले नाही. यानंतर अश्विनला संघाबाहेर काढण्यात येणार अशी चर्चा रंगली होती.

शिखर धवनचे नवीन 'टॅलेंट' जगासमोर, चाहते म्हणाले 'सुपर'

अश्विनने २०१८ आणि २०१९ या दोन हंगामात खेळताना सामान्य कामगिरी केली होती. या हंगामामध्ये त्याने एकून २८ सामने खेळत २५ गडी बाद केले. अश्विनच्या नेतृत्वात पंजाबचा संघ २०१८ मध्ये ७ व्या तर २०१९ मध्ये सहाव्या क्रमाकांवर राहिला. दरम्यान, २०२० मध्ये जर दिल्लीने अश्विनला संघात घेतले तर अश्विनचा हा आयपीएसमधील चौथा संघ ठरणार आहे. याआधी अश्विन चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सदस्य राहिला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.