ETV Bharat / sports

CSK vs KKR : चेन्नईचा सनसनाटी विजय...ऋतुराज गायकवाडचे ३७ चेंडूत अर्धशतक

author img

By

Published : Oct 29, 2020, 6:56 PM IST

Updated : Oct 30, 2020, 12:39 AM IST

सलामीवीर नितीश राणाच्या झुंजार ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऋतुराज गायकवाडच्या ७२ धावांच्या जोरावर आणि अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने केलेल्या धमाकेदार फटकेबामुळे विजय खेचून आणता आला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

IPL 2020, CSK vs KKR Match 49 Live Updates:
LIVE CSK vs KKR : थोड्याच वेळात नाणेफेक

दुबई -सलामीवीर नितीश राणाच्या झुंजार ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऋतुराज गायकवाडच्या ७२ धावांच्या जोरावर आणि अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने केलेल्या धमाकेदार फटकेबाजीमुळे विजय खेचून आणता आला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने धमाकेदार फटकेबाजी करत चेन्नईसाठी विजय खेचून आणला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने यावेळी ५३ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. जडेजाने यावेळी ११ चेंडूत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ३१ धावांची फटकेबाजी केली.

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा शुबमन गिल आणि नितीश राणा या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी सलामी दिली. दोघांनी ५३ धावांची भागीदारी झाल्यानंतर कर्ण शर्माने गिलला क्लिन बोल्ड करत केकेआरला पहिला धक्का दिला. गिलने १७ चेंडूत ४ चौकारासह २६ धावा केल्या. यानंतर केकेआरच्या डावाला लागलेली गळती लागली. सुनील नरेन (७) , रिंकू सिंह (११) हे स्वस्तात माघारी परतले. कर्णधार मॉर्गनला वरच्या फळीत फलंदाजीला येणे अपेक्षित होते. पण त्याने रिंकू सिंहला वरच्या फळीत फलंदाजीला पाठवले. यामुळे महत्वाच्या षटकांमध्ये केकेआरचा संघ अपेक्षित धावगती राखू शकला नाही.

नितीश राणाने एक बाजू पकडून ठेवली. त्याने कर्णधार मॉर्गनसोबत भागीदारी करत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत नितीश राणाने ६१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ८७ धावा केल्या. लुंगी एनगिडीने त्याला बाद केले. अखेरीस कर्णधार मॉर्गन (१५) आणि दिनेश कार्तिक (नाबाद २१) यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिली. चेन्नईकडून एनगिडीने २ तर सँटनर, जडेजा, शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जात आहे. कोलकातासाठी हा सामना करा किंवा मरा स्थितीतील आहे. तर चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेले आहे. यामुळे त्यांच्यासाठी हा सामना केवळ औपचारिकता राहिला आहे. चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

कोलकाताने आपल्या संघात एक बदल केला असून त्यांनी प्रसिद्ध कृष्णाच्या जागेवर फलंदाज रिंकू सिंगला स्थान दिले आहे. तर चेन्नईने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. त्यांनी फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहीर आणि मोनू कुमारला बाहेर केले आहे. त्यांच्या जागेवर शेन वॉटसन, लुंगी एनगिडी आणि कर्ण शर्माला घेतले आहे.

चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी पहिल्यास, आतापर्यंत उभय संघात २२ सामने झाले आहेत. यात चेन्नईने १३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता ८ सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.

LIVE UPDATE :-

  • सीएसकेचा नाइट रायडर्सवर सनसनाटी विजय
  • चेन्नईला २ चेंडूत ७ धावांची गरज
  • चेन्नईला ६ चेंडूत १० धावांची गरज
  • चेन्नईला विजयासाठी १२ चेंडूत ३० धावांची गरज
  • चेन्नईला चौथा झटका, सेट फलंदाज गायकवाड (७२) क्लिन बोल्ड, कमिन्सने घेतला बळी
  • चेन्नईला विजयासाठी १८ चेंडूत ३४ धावांची गरज
  • चेन्नईला मोठा धक्का, चक्रवर्तीच्या फिरकीवर धोनी क्लिन बोल्ड
  • महेंद्रसिंह धोनी मैदानात
  • चेन्नईला दुसरा धक्का, अंबाटी रायुडू (३८) बाद, कमिन्सच्या गोलंदाजीवर नरेनने टिपला झेल
  • चेन्नई १२ षटकात १ बाद १००
  • चेन्नईचे शतक पूर्ण
  • ऋतुराजचे अर्धशतक पूर्ण
  • चेन्नईला पहिला धक्का, वॅटसन (१४) चक्रवर्तीच्या गोलंदीवर झेलबाद, रिंकू सिंहने टिपला झेल
  • चेन्नईची आश्वासक सुरूवात, पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४४ धावा
  • चेन्नईच्या डावाला सुरूवात, सलामीवीर वॅटसन, गायकवाड मैदानात
  • कोलकाता २० षटकात ५ बाद १७२
  • कोलकाताला पाचवा धक्का, मॉर्गन बाद
  • नितीश राणा एनगिडीच्या गोलंदाजीवर (८७) बाद, सॅम करनने टिपला झेल
  • राणाने कर्ण शर्माचा घेतला समाचार, १६व्या षटकात सलग तीन षटकारांसह वसूल केल्या १९ धावा
  • कोलकाता १५ षटकात ३ बाद १०६
  • कोलकाताचे शतक पूर्ण
  • नितीश राणाचे झुंजार अर्धशतक
  • कोलकाला तिसरा धक्का, रिंकू सिंह बाद, जडेजाच्या गोलंदाजीवर रायुडूने घेतला झेल
  • कोलकाता १० षटकात २ बाद ७०
  • कोलकाताचा दुसरा गडी बाद, सुनील नरेन (७) सँटनरच्या गोलंदाजीवर झेलबाद, जडेजाने टिपला झेल
  • कोलकाताला पहिला धक्का, शुबमन गिलला (२६) कर्ण शर्माने केले क्लिन बोल्ड
  • कोलकाता पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४८
  • राणाने सँटनरला सहाव्या षटकात धुतलं, दोन चौकार आणि एका षटकारासह वसूल केल्या १५ धावा
  • कोलकाताची आक्रमक सुरूवात, दीपक चहरच्या पहिल्या षटकात खेचले ३ चौकार, कोलकाता १ षटकात बिनबाद १३
  • कोलकाताची सलामीवीर जोडी शुबमन गिल, नितिश राणा मैदानात
  • चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
  • थोड्याच वेळात होणार नाणेफेक

कोलकाताचा संघ -

दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितिश राणा, राहुल त्रिपाठी, सुनील नरेन, रिंकू सिंह, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती

चेन्नईचा संघ -

ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), एन जगदीशन, सॅम करन, रविंद्र जडेजा, मिचेल सँटनर, कर्ण शर्मा, दीपक चहर आणि लुंगी एनगिडी.

Last Updated : Oct 30, 2020, 12:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.