ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

author img

By

Published : Aug 29, 2019, 10:15 PM IST

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

  • BCCI: India’s squad for 3 T20Is against South Africa: Kohli (Captain), Rohit (VC), KL Rahul, Shikhar Dhawan, Shreyas, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Krunal Pandya, Washington Sundar, Rahul Chahar, Khaleel Ahmed, Deepak Chahar, Navdeep Saini

    — ANI (@ANI) August 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निवड झालेल्या संघात महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. धोनीच्या जागी यष्टीरक्षक म्हणून वृषभ पंतला संधी देण्यात आली आहे. १५ जणांच्या या संघात भावांच्या दोन जोड्यांचा (हार्दिक पंड्या-कृणाल पंड्या आणि राहुल चहर-दीपक चहर) समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. टी-20 मालिकेसाठी संघ निवडताना आगामी टी-20 विश्वचषकाचा विचार करूनच खेळाडूंची निवड केल्याची शक्यता आहे.

टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वृषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.