ETV Bharat / sports

ऐतिहासिक 'गुलाबी' विजयानंतर भारतीय संघाने केलेले विक्रम, वाचा एका क्लिकवर.....

author img

By

Published : Nov 25, 2019, 10:18 AM IST

कोलकाता कसोटीत ९ गडी बाद करणाऱ्या ईशांत शर्माला सामनावीर आणि मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. वाचा भारतीय संघाने केलेले विक्रम...

ऐतिहासिक 'गुलाबी' विजयानंतर भारतीय संघाने केलेले विक्रम, वाचा एका क्लिकवर.....

कोलकाता - भारत आणि बांगलादेश संघात गुलाबी चेंडूवर झालेला ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना, भारताने १ डाव ४६ धावांनी जिंकला. भारतीय संघाने या विजयासह २ सामन्यांच्या मालिकेत २-० ने निर्भेळ यश संपादन केले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान बळकट केले. कोलकाता कसोटीत ९ गडी बाद करणाऱ्या ईशांत शर्माला सामनावीर आणि मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. वाचा भारतीय संघाने केलेले विक्रम...

भारतीय संघाचे विक्रम -

  • भारतीय संघाने बांगलादेशला ११ कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. भारतात उभय संघात आजघडीपर्यंत ३ कसोटी सामने झाले. हे तीनही सामने भारतीय संघाने जिंकले.
  • भारत आणि बांगलादेश संघाचा पहिला दिवस-रात्र कसोटी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगला होता. हा सामना भारताने जिंकला.
  • भारतीय संघाने लागोपाठ सात कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला.
  • विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल ११ सामन्यात एक डाव राखून प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला. महत्वाची बाब म्हणजे, भारतीय संघाने लागोपाठ ४ सामने एक डाव राखून जिंकले आहेत.
  • भारतीय संघाने लागोपाठ ७ वेळा आपला डाव घोषित केला. हा एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी इंग्लंडने ६ वेळा डाव घोषित केला होता.
  • भारतीय वेगवान गोलंदाजांनी कोलकाता कसोटीत १९ गडी बाद केले. या सामन्यात फिरकीपटूंना एकही गडी बाद करता आला नाही. हाही एक विक्रम असून यापूर्वी भारतीय संघाला फक्त एकदाच अशी किमया साधता आली आहे. २०१७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी १७ गडी बाद केले होते.
  • भारतीय गोलंदाजांनी मायदेशात खेळवण्यात आलेल्या कसोटीत एक डावात चौथ्यांदा १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी १९८१-८२ मध्ये इंग्लंड (मुंबई), १९८३-८४ मध्ये वेस्ट इंडीज (अहमदाबाद) आणि २०१७-१८ मध्ये श्रीलंका (कोलकाता) विरुध्द भारतीय गोलंदाजांनी असा पराक्रम केला होता.
Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.