ETV Bharat / sports

भारतीय क्रिकेटपट्टूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, एटीएसची कारवाई

author img

By

Published : Aug 22, 2019, 4:45 PM IST

भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. आरोपीने १६ ऑगस्ट रोजी बीसीसीआयला ई-मेल करुन धमकी दिली होती. या प्रकरणी एटीएसने ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव ब्रज मोहन दास असे असून त्याला आसामच्या मोरिगाव जिह्यातील शांतीपूर येथून अटक करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेटपटूना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, एटीएसची कारवाई

मुंबई - भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. आरोपीने १६ ऑगस्ट रोजी बीसीसीआयला ई-मेल करुन धमकी दिली होती. या प्रकरणी एटीएसने ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव ब्रज मोहन दास असे असून त्याला आसामच्या मोरिगाव जिह्यातील शांतीपूर येथून अटक करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी १६ ऑगस्टला ई-मेलद्वारे बीसीसीआयला मिळाली. तेव्हा या संदर्भात एटीएसच्या पथकाने तपास सुरू केला होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, एटीएसने आसाम पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपीने ई- मेल करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य ही जप्त केले.

आसाममधील न्यायदंडाधिकारी न्यायालयातून सदर आरोपीचा ट्रान्झिस्ट रिमांड मुंबई एटीएस युनिटला मिळाला होता. तेव्हा त्याला मुंबईतील माझगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पोलिसांच्या अधिक तपासासाठी या आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:16 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीसीसीआय च्या कार्यालयाला ई मेल द्वारे भारतीय क्रिकेट पटूंना जीवे मारण्याची धनाकी देणाऱ्या आरोपीला एटीएस ने आसाम येथून अटक केली आहे. या प्रकरणी एटीएस ने आसाम राज्यातील मोरिगाव जिल्ह्यातील शांतीपुर येथून ब्रज मोहन दास या आरोपिला अटक केली आहे. Body:भारतीय क्रिकेट पटूंना जीवे मारण्याची धमकी ई मेल द्वारे बीसीसीआय ला आरोपीने दिल्यानंतर या संदर्भात दहशतवादी विरोधी पथकाने तपास सुरू केला होता. या दरम्यान मिळालेल्या माहितीवरून एटीएस ने आसाम पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करून त्याच्याकडील ईमेल करण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिकदहित्य सुद्धा हस्तगत केले आहे. आसाम मधील न्याय दंडाधिकारी न्यायालयातून सदर आरोपीचा ट्रांजीस्ट रिमांड मुंबई एटीएस युनिटला मिळाला असता त्याला मुंबईतील माझगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पोलिसांच्या अधिक तपासासाठी आरोपीला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.