ETV Bharat / sports

IND W vs SA W ODI Series : भारताला धक्का, स्मृती मानधनाची मालिकेतून माघार

author img

By

Published : Oct 8, 2019, 4:55 PM IST

स्मृतीला रविवारी सरावादरम्यान, दुखापत झाली. त्यामुळे तिला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. स्मृती मानधना लयीत असल्याने, त्याच्या माघारीमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. मागील १८ सामन्यात खेळताना स्मृतीने ६७.८६ च्या सरासरीने १०१८ धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, आफ्रिकेविरुध्दच्या भारताने जिंकलेल्या टी-२० मालिकेत स्मृतीला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.

IND W vs SA W ODI Series: भारताला धक्का, स्मृती मानधनाची मालिकेतून माघार

नवी दिल्ली - भारतीय आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या सामन्यातील पहिला सामना बुधवारी बडोदा येथे रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

स्मृतीला रविवारी सरावादरम्यान, दुखापत झाली. त्यामुळे तिला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. स्मृती मानधना लयीत असल्याने, त्याच्या माघारमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. मागील १८ सामन्यात खेळताना स्मृतीने ६७.८६ च्या सरासरीने १०१८ धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, आफ्रिकेविरुध्दच्या भारताने जिंकलेल्या टी-२० मालिकेत स्मृतीला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.

IND W vs SA W ODI Series: Smriti Mandhana Ruled Out of South Africa ODIs Due to Fractured Toe
स्मृती मानधना फलंदाजी दरम्यान...

दरम्यान, नुकतीच पार पडलेली आफ्रिकेविरुध्दची ५ सामन्यांची टी-२० मालिका भारताने ३-१ ने जिंकली होती. या संपूर्ण मालिकेत स्मृती अवघ्या ४६ धावा करु शकली होती. स्मृतीला २०१८ ला आयसीसीचा बेस्ट महिला एकदिवसीय खेळाडू पुरस्कार मिळालेला असून तिने एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानही पटकावले होते.

स्मृती मानधना
स्मृती मानधना

भारतीय संघ -

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, तानिया भाटीया, एकता बिस्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, दयालन हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, पूनम यादव, प्रिया पुनिया, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा.

आफ्रिकेविरुध्दच्या एकदिवसीया मालिकेचे वेळापत्रक -
पहिला सामना - ९ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजल्यापासून
दुसरा सामना - ११ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजल्यापासून
तिसरा सामना - ११ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजल्यापासून

हेही वाचा - रोहित शर्माची कसोटी क्रमवारीत मोठी झेप, कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

हेही वाचा - पाक खेळाडूची लाजिरवाणी कामगिरी, ३ वर्षानंतर केलं होतं संघात पुनरागमन

Intro:Body:

sports marathi


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.