ETV Bharat / sports

Women's T२० WC : ..तर टीम इंडिया सामना न खेळताच अंतिम फेरीत, वाचा कारण

author img

By

Published : Mar 3, 2020, 8:58 PM IST

भारतीय संघाने 'अ' गटातून सर्व म्हणजे चारही सामने जिंकले आहेत. या गटातून भारतीय संघ ०.९७९ च्या नेटरेटने ८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या कारणाने जर इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि इंग्लंडचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात येईल.

ICC Womens T20 World Cup 2020: What If Both Semifinals Get Washed Out?
Women's T२० WC : ..तर टीम इंडिया सामना न खेळताच अंतिम फेरीत, वाचा कारण

सिडनी - भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघात होईल. भारताचा सामना ५ मार्चला होणार आहे. जर गुरूवारी होणाऱ्या या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल.

भारतीय संघाने 'अ' गटातून सर्व म्हणजे चारही सामने जिंकले आहेत. या गटातून भारतीय संघ ०.९७९ च्या नेटरेटने ८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या कारणाने जर इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि इंग्लंडचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात येईल. दुसरीकडे जर पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना रद्द झाला तर दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात पोहोचेल. यामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो.

दरम्यान उपांत्य फेरीच्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरूवारी सिडनीत पावसाची दाट शक्यता आहे. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताची कामगिरी -

भारताने 'अ' गटात खेळताना पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला १८ धावांनी नमवलं. न्यूझीलंडविरुद्धची लढत रोमहर्षक ठरली. यामध्ये भारताने ३ धावांनी बाजी मारली. शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ७ गडी राखून धुव्वा उडवला.

हेही वाचा - कोरोनाची दहशत : इंग्लंडचे खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवणार नाहीत

हेही वाचा - विराट, आता तुझं वय झालंय अधिक सराव कर.., भारताच्या माजी कर्णधाराचा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.