ETV Bharat / sports

हैदराबादला नमवून दिल्लीची प्रथमच फायनलमध्ये धडक, आता गाठ मुंबईशी

author img

By

Published : Nov 8, 2020, 7:00 PM IST

Updated : Nov 9, 2020, 12:16 AM IST

दिल्लीने क्वालिफायर सामन्यात हैदराबादचा 17 धावांनी पराभव करत आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. त्यांची गाठ आता बलाढ्य मुंबईशी होणार आहे.

DC vs SRH Live Score, IPL 2020 Playoffs Latest Updates
दिल्लीचा विजय

अबुधाबी - दिल्लीने क्वालिफायर सामन्यात हैदराबादचा 17 धावांनी पराभव करत आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. त्यांची गाठ आता बलाढ्य मुंबईशी होणार आहे. दिल्लीने दिलेले 190 धावांचे लक्ष्य हैदराबादला पेलवले नाही, त्याचा संघ 172 धावांपर्यत मजल मारू शकला. केन विल्यम्सन आणि अब्दुल समद यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगात आणली. मात्र, मोक्याच्या क्षणी विल्यम्सन बाद झाल्याने सामना दिल्लीच्या बाजूने फिरला.

'करो या मरो'च्या सामन्यात विजय मिळवत दिल्लीने पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मार्कस स्टॉयनिसने (3-0-26-3) सरनायजझर्सच्या तीन गड्यांना तंबूत धाडले, यात केन विलियम्सयाही समावेश होता. त्यासोबतच कगिसो रबाडाने (4-0-29-4) चार गडी बाद करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

pic
छायाचित्र

१९० धावांचा पाठलाग करताना हैदराबादला पहिला धक्का १२ धावांवर बसला. रबाडाने कॅप्टन डेविड वार्नला (2) धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर आलेल्या प्रियम गर्गला मार्कस स्टॉयनिसने त्रिफळाचित केले. त्याच षटकात मनीष पांडेही २१ धावांवर बाद झाल्याने हैदराबादच्या संघाची स्थिती नाजूक झाली. त्यांतर अक्षर पटेलने जेसन होल्डरला ११ धावांवर बाद केले. ९० धावा असताना हैदराबादचे ४ गडी बाद झाले होते. मात्र, त्यांनतर केन विलियम्सने अब्दुल समद सोबत ५७ धावांची भागीदारी केली. विजय दृष्टिक्षेपात येत असतानाच विलियम्सनचा ६७ धावांवर स्टोइनिसने रबाडाकरवी झेलबाद केले.

अब्दुल समद चांगली फलंदाजी करत असल्याने विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, ३३ धावांवर तो झेलबाद झाला. त्यानंतर रबाडाने राशिद खान ला ११ धावांवर बाद केले. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर श्रीवत्स गोस्वामी शुन्यावर बाद झाला. १६७ धावांवर सहावा आणि सातवा गडी बाद झाल्यांतर १६८ धावांवर ८ वा गडीही बाद झाला.

तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा त्याने शिखर धवनसोबत मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवले. शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी केलेल्या ८६ धावांच्या मजबूत सलामीनंतर व हेटमायरने शेवटच्या काही षटकात केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने हैदराबादपुढे विजयासाठी १९० धावांचे मजबूत लक्ष्य ठेवले. धवनने ५० चेंडूत ७८ धावांची खेळी करत दिल्लीच्या मोठी धावसंख्येची पायाभरणी केली. तर अखेरच्या षटकात हेटमायरने फटकेबाजी करत २२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.

धवन-स्टॉयनिस या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. स्टॉयनिसने तर होल्डरच्या चौथ्या षटकात तीन चौकार आणि १ षटकारासह १८ धावा वसूल केल्या. धवन-स्टॉयनिस जोडीने पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६५ धावा धावफलकावर लावल्या. दोघांनी ८.२ षटकात ८६ धावांची सलामी दिली. राशिद खानने स्टॉयनिसला क्लिन बोल्ड करत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. स्टॉयनिसने २७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ३८ धावा केल्या.

स्टॉयनिस बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. त्याने धवनसोबत फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दोघांनी दिल्लीला शंभरी गाठून दिली. होल्डरच्या गोलंदाजीवर अय्यर बाद झाला. त्याचा झेल मनीष पांडेने टिपला. त्याने २१ धावांची खेळी केली. यानंतर शिमरोन हेटरमायरने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपले मनसुबे जाहीर केले. शिखर-हेटमायर या दोघांनी दिल्लीला दीडशेपार मजल मारुन दिली. ७८ धावांवर खेळणाऱ्या शिखर धवनला संदीप शर्माने पायचित केले. धवनने ६ चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी साकारली. धवन बाद झाल्यानंतर हेटमायरने डावाची सूत्रे हाती घेत फटकेबाजी केली. त्याने २२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Last Updated : Nov 9, 2020, 12:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.