ETV Bharat / sports

IPL स्पर्धेत ख्रिस गेलच्या 'जमैका टू इंडिया' गाण्याची धमाल, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Apr 12, 2021, 7:01 PM IST

Updated : Apr 12, 2021, 7:14 PM IST

प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाय याच्यासोबत गेलने हे गाणं गायलं आहे. गेलचं हे गाणं हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे.

chris-gayle-music-song-jamaica-to-india-with-emiway-bantai-viral-on-social-media
IPL स्पर्धेत ख्रिस गेलच्या 'जमैका टू इंडिया' गाण्याची धमाल, पाहा व्हिडिओ

मुंबई - ख्रिस गेल क्रिकेट विश्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याची वयाच्या ४१व्या वर्षी देखील मैदानात दहशत आहे. ख्रिस गेल सध्या आयपीएल स्पर्धेसाठी भारतात आहे. पंजाब किंग्ज संघाचा सदस्य असलेला गेल आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी सज्ज आहे. पण, त्याआधी गेलचं 'जमैका टू इंडिया' हे गाणं रिलीज झालं आहे.

प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाय याच्यासोबत गेलने हे गाणं गायलं आहे. गेलचं हे गाणं हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. गेलनं इंग्रजीमध्ये तर एमिवे याने हिंदीमध्ये हे गाणं गायले आहे. टोनी जेम्स यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गेलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या पूर्वीच हे गाणं लोकप्रिय होत आहे.

दरम्यान, गेल मैदानाच्या बाहेर त्याच्या धमाल लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे. गेलने यापूर्वी देखील अनेकदा मजेदार व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

हेही वाचा - IPL २०२१ : असा पराक्रम फक्त ख्रिस गेलच करू शकतो, 'या' विक्रमापासून रोहित, विराटसह मातब्बर कोसो दूर

हेही वाचा - IPL २०२१ : रोहितला धावबाद करणाऱ्या लीनचा पत्ता कट; जहीरने केली मोठी घोषणा

Last Updated : Apr 12, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.