ETV Bharat / sports

धोनी असल्यावर प्रशिक्षकाची आठवण येत नाही - कुलदीप यादव

author img

By

Published : Apr 24, 2020, 5:39 PM IST

कुलदीप एका व्हिडिओमध्ये म्हणाला, “विकेटच्या मागून धोनी बरेच काही सांगतो. चेंडू फिरायला हवा तो सपाट राहू नये, असे तो म्हणायचा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मी त्याच्याकडून शिकलो.

Can't miss coach beacause of dhoni said kuldeep yadav
धोनी असल्यावर प्रशिक्षकाची आठवण येत नाही - कुलदीप यादव

नवी दिल्ली - भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. कुलदीप म्हणाला, “आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला फिरकी गोलंदाज होण्यासाठी धोनीची खूप मदत झाली. धोनी असल्यावर प्रशिक्षकाची गरज भासत नाही. कारण फिरकी गोलंदाजीबद्दल दोघांचेही विचार समान आहेत.”

कुलदीप एका व्हिडिओमध्ये म्हणाला, “विकेटच्या मागून धोनी बरेच काही सांगतो. चेंडू फिरायला हवा तो सपाट राहू नये, असे तो म्हणायचा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मी त्याच्याकडून शिकलो.” सुपर ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी करायला आवडणार नाही असे विचारले असता, कुलदीपने मुंबईच्या सूर्यकुमार यादवचे नाव घेतले. फिरकी गोलंदाजांना तो खूपच चांगला खेळतो. शिवाय, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर देखील फिरकीपटूला छान खेळतात”, असे कुलदीपने म्हटले आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.