ETV Bharat / sports

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित २ कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

author img

By

Published : Feb 17, 2021, 4:25 PM IST

Updated : Feb 17, 2021, 4:38 PM IST

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज आपला संघ जाहीर केला आहे.

bcci announce team india squad for final two Tests against England
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित २ कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

अहमदाबाद - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज आपला संघ जाहीर केला आहे. निवड समिती उर्वरित कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीच्या नावाचा विचार करेल अशी अपेक्षा होती, परंतु शमी व नवदीप सैनी यांना विश्रांती देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.

निवड समितीने उर्वरीत दोन कसोटीसाठी शार्दूल ठाकूर याला संघातून वगळले आहे. त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज करण्यात आले आहे. त्याच्या जागी उमेश यादव याचा संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु, उमेशला फिटनेस टेस्टमध्ये पास व्हावे लागेल. पहिली कसोटी खेळणाऱ्या शाहबाज नदीमला देखील दोन्ही कसोटीतून वगळण्यात आले आहे.

  • TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma, Mayank Agarwal, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane (vc), KL Rahul, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), Wriddhiman Saha (wk), R Ashwin, Kuldeep Yadav, Axar Patel, Washington Sundar, Ishant Sharma, Jasprit Bumrah, Md. Siraj.

    — BCCI (@BCCI) February 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निवड समितीने पाच नेट गोलंदाज आणि दोन रिझर्व खेळाडूंच्या नावाची देखील घोषणा केली आहे. अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, कृष्णप्पा गौतम आणि सौरभ कुमार यांची निवड नेट गोलंदाज म्हणून करण्यात आली आहे. तर केएस भरत आणि राहुल चहर यांना रिझर्व खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

मालिका सद्यघडीला आहे बरोबरीत

भारत-इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे खेळवण्यात आले. पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारतीय संघाने ३१७ धावांनी जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. उभय संघातील तिसऱ्या सामन्याला २४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.

असा आहे भारतीय संघ -

विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा - अरेरे...पराभवासोबत इंग्लंडच्या नावावर नोंदवला गेला लाजिरवाणा विक्रम

हेही वाचा - IND Vs ENG: विराट अहमदाबाद कसोटीला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

Last Updated : Feb 17, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.