ETV Bharat / sports

Afg vs Ban: अफगाणिस्तानने केला यजमान बांगलादेशचा पराभव

author img

By

Published : Sep 15, 2019, 11:01 PM IST

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारीत २० षटकांमध्ये ६ गडी बाद १६४ धावा केल्या होत्या. यात मोहम्मद नबीने ५४ चेंडूत ३ चौकार, ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा चोपल्या. असगर अफगाण यानेही ३७ चेंडूत ४० धावा केल्या. बांगलादेशकडून मोहम्मद सैफूद्दीन याने ४ तर साकिब अल हसनने २ गडी बाद केले.

अफगाणिस्तानचा संघ

ढाका - बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तिरंगी टी-२० मालिकेत अफगाणिस्तानने यजमान बांगलादेश संघाचा २५ धावांनी पराभव केला. अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी आणि गोलंदाज मुजीब-उर-रहमान यांच्या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने विजय मिळवला. या विजयाबरोबर अफगाणिस्तानच्या संघ गुणातालिकेत ८ गुणांसह पहिल्या क्रमाकांवर पोहोचला आहे.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारीत २० षटकांमध्ये ६ गडी बाद १६४ धावा केल्या होत्या. यात मोहम्मद नबीने ५४ चेंडूत ३ चौकार, ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा चोपल्या. असगर अफगाण यानेही ३७ चेंडूत ४० धावा केल्या. बांगलादेशकडून मोहम्मद सैफूद्दीन याने ४ तर साकिब अल हसनने २ गडी बाद केले.

बांगलादेशपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान होते. मात्र, बांगलादेशचा संघ १९.५ षटकात १३९ धावांवर अटोपला. बांगलादेसकडून महमूद्दूल्लाहने ३९ चेंडूत ४४ धावा केल्या. मात्र, अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने ४ गडी बाद करत बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याला फरिद मलिक, कर्णधार राशिद खान आणि गुलबदीन नैब यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत साथ दिली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.