ETV Bharat / sports

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा

author img

By

Published : Jan 13, 2021, 6:13 PM IST

Updated : Jan 13, 2021, 7:32 PM IST

दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर निवडलेल्या धनंजय डिसिल्वा, कसुन राजिता, सांतुस गुणाथिलके आणि दिलशान मदुशंका या खेळाडूंना इंग्लंड दौऱ्याबाहेर करण्यात आले आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप, रोशन सिल्वा, लक्षण संदाकन आणि रमेश मेंडिस यांचा या संघात समावेश आहे. ही मालिका मागील वर्षी मार्चमध्ये मालिका खेळली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

Angelo mathews returns to sri lanka team for test series with england
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी श्रीलंका संघाची घोषणा

कोलंबो - श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचा समावेश केला आहे. ३३ वर्षीय मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी आतापर्यंत ८६ कसोटी सामने खेळले आहेत. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या येऊ शकला नव्हता.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर निवडलेल्या धनंजय डिसिल्वा, कसुन राजिता, सांतुस गुणाथिलके आणि दिलशान मदुशंका या खेळाडूंना इंग्लंड दौऱ्याबाहेर करण्यात आले आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप, रोशन सिल्वा, लक्षण संदाकन आणि रमेश मेंडिस यांचा या संघात समावेश आहे. ही मालिका मागील वर्षी मार्चमध्ये मालिका खेळली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

दोन सामन्यांची कसोटी मालिका प्रेक्षकांशिवाय गॉलमध्ये खेळली जाईल. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे.

श्रीलंका संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कुसल झेनिथ परेरा, दिनेश चंडीमल, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, ओशादा फर्नांडो, निरोशन डिकवेला, मिनोद भानुका, लाहिरू थिरिमाने, लसिथ अंबुलडेनिया, वनिंदू हसेरंगा, सुरेन्द्र परेंद्र विश्व फर्नांडो, दुशमंत चमीरा, दासुन शनाका, असिता फर्नांडो, रोशन सिल्वा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, रमेश मेंडिस.

हेही वाचा - पांड्या-हुड्डाच्या भांडणात इरफान पठाणची उडी, म्हणाला...

Last Updated : Jan 13, 2021, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.