ETV Bharat / sports

'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये', चोप्राने केली पाक चाहत्याची बोलती बंद

author img

By

Published : Mar 9, 2020, 8:23 PM IST

पाकिस्तानच्या चाहत्याने त्या ट्विटवरुन चोप्रासह भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रतत्न केला. तेव्हा चोप्राने, तुमच्या पुरूष आणि महिला संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर किती बाद फेरीची सामने खेळले? असा सवाल केला. तसेच त्याने काचेची घरं असलेल्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये, असे सडेतोड उत्तर दिले. यामुळे पाकिस्तानच्या चाहत्याची बोलती बंद झाली.

Aakash Chopra Lashes Out At Pakistani Fan After Latter Mocks Indias Loss In Women’s T20 WC Final
'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये', आकाश चोप्राच्या उत्तराने पाक चाहत्याची बोलती बंद

मुंबई - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ८५ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्यासह अनेकांनी भारतीय संघाचे मनोबल उंचावण्यासाठी सांत्वनपर ट्विट केले. पण, एका पाकिस्तानी नागरिकाने चोप्राच्या त्या ट्विटवरून भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोप्रानेही त्याला जशाच तसे उत्तर देताना चांगलेच सुनावले.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर आकाश चोप्राने एक ट्विट केले. त्यात त्याने, भारताने विश्वकरंडक स्पर्धेत केवळ एकच पराभव पत्करला. तसा एक पराभव ऑस्ट्रेलियाचाही झाला. विशेष म्हणजे, दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध पराभूत झाले. भारताने सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्या पराभवाची परतफेड केली. यालाच आयुष्य म्हणतात, असे म्हटले.

  • India lost only one game in the tournament. So did Australia. Both teams lost to each other. India beat Aus in the tournament opener. Australia beat India in the finals. Such is life.... #WT20WC #AusvInd

    — Aakash Chopra (@cricketaakash) March 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तानच्या चाहत्याने त्या ट्विटवरुन चोप्रासह भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोप्राने, तुमच्या पुरूष आणि महिला संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर किती बाद फेरीची सामने खेळले? असा सवाल केला. तसेच त्याने काचेची घरं असलेल्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये, असे सडेतोड उत्तर दिले. यामुळे पाकिस्तानच्या चाहत्याची बोलती बंद झाली.

  • How many knockouts did your team play since that final? Men and Women included. Jinke ghar sheeshe ke hote hain voh light jala ke kapde nahin badalte, dost 🙏 https://t.co/xUiL4hIePP

    — Aakash Chopra (@cricketaakash) March 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, जागतिक महिला दिनी रंगलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी-२० विश्वविजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून ऑसीने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीने नाबाद अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ९९ धावांवर सर्वबाद झाला. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली.

हेही वाचा - कोरोना व्हायरसचा आयपीएलला दणका?, BCCIकडून मिळाली मोठी अपडेट

हेही वाचा - माहीची अग्निपरीक्षा..! भारतीय संघात पुनरागमनासाठी धोनीपुढे बीसीसीआयने ठेवली 'ही' अट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.