ETV Bharat / sports

Chris Lynn Statement : उमरान मलिकला टी-20 विश्वचषकात खेळताना बघायला आवडेल - क्रिस लिन

author img

By

Published : Apr 28, 2022, 4:13 PM IST

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू क्रिस लिन ( Australian cricketer Chris Lynn ) याने सांगितले की, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या ICC T20 विश्वचषकासाठी भारताच्या संघात पाहायला आवडेल. लीनने सांगितले की T20 विश्वचषक 2022 चा यजमान देश ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी उसळी आणि वेग घेणारी असून उमरान मलिकच्या गोलंदाजीच्या शैलीला अनुकूल असेल.

Umran Malik
Umran Malik

मुंबई: आयपीएल 2021 दरम्यान, टी नटराजन कोविडची लागण झाल्याचे आढळल्यानंतर उमरान मलिकला ( Fast bowler Umran Malik ) संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्या काळात मलिकने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करून सर्वांनाच चकित केले. त्यानंतर मलिक हा संघाचा मुख्य गोलंदाज बनला आहे. त्याने आपल्या वेगाच्या जोरावर फलंदाजांवर दडपण आणले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरातकडून हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात उमरान मलिकलने पाच विकेट्स घेतल्या. त्यावर आता क्रिस लिनने उमरान मलिकबाबत मोठे वक्तव्य ( Chris Lynn Statement ) केले आहे.

भारताकडून खेळण्याची संधी द्यायला हवी - ईएसपीएन क्रिकइन्फोच्या टी-20 टाइम-आउट शोमध्ये लिन ( Australian cricketer Chris Lynn ) म्हणाला, "मलिक गेल्या तीन सामन्यांपासून खूप चांगली कामगिरी करत आहे आणि बुधवारी त्याने ज्या प्रकारे खेळ केला ते खरोखर प्रशंसनीय आहे. आयपीएलच्या या मोसमात तरुण आपली उत्तम कामगिरी दाखवत आहे. त्याचे क्रिकेट पाहता त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारताकडून खेळण्याची संधी द्यायला हवी, असे मला वाटते.

बुधवारी हैदराबादचा संघ गुजरातविरुद्धचा सामना पाच गडी राखून हरला. मात्र, हैदराबादकडून मलिकने सर्वोत्तम कामगिरी केली. तो 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो, तर कधी 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. त्याने शुभमन गिल, रिद्धिमान साहा, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांना क्लीन बोल्ड केले, तर हार्दिक पांड्याला शॉर्ट बॉल मारण्यास भाग पाडले, ज्यावर तो झेलबाद झाला.

तरुण गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी - लिन पुढे म्हणाला, “मलिक लवकरच सामन्यांमध्ये परतला. सुरुवातीला, त्याच्या कामगिरीवरून असे वाटत होते की, तो पुढे खेळू शकणार नाही, परंतु संघ व्यवस्थापनाने ज्या प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवला तो त्याने पूर्ण केला. तरुण गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग फलंदाजांना त्रास देत आहे. आयपीएलमध्ये त्याच्या पहिल्या पाच विकेट्ससह, मलिकने चालू स्पर्धेत एकूण 15 विकेट घेतल्या, जे आता टी नटराजनच्या बरोबरीने आहे. तो टेबल टॉपरवर असलेल्या युझवेंद्र चहलपासून फक्त तीन विकेट्स दूर आहे.

न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी ( Former spinner Daniel Vettori ) याला वाटते की, नजीकच्या भविष्यासाठी युवा वेगवान गोलंदाजांच्या कामाचा भार भारतीय संघ व्यवस्थापनाने नीट पाहिला पाहिजे. तसेच, त्यांच्या कार्यभाराचे व्यवस्थापन बीसीसीआय ( BCCI ) आणि एनसीए ( NCA ) च्या देखरेखीखाली केले जावे.

हेही वाचा - IPL 2022 DC vs KKR : पंधराव्या हंगामात आज पुन्हा एकदा दिल्ली आणि कोलकाता आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.