ETV Bharat / sports

New BCCI President 2022 : भारताचे माजी क्रिकेटपटू राॅजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड

author img

By

Published : Oct 18, 2022, 1:49 PM IST

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज चालू असताना, त्यात अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी ( AGM of BCCI at Taj Hotel in Mumbai ) राॅजर बिन्नी यांची निवड ( Roger Binny Appointed as BCCI President ) करण्यात येणार आहे. रॉजर बिन्नी यांनी आज बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. नुकतेच ( AGM of BCCI at Taj Hotel in Mumbai ) अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या सौरव गांगुलीची जागा ते घेणार आहेत. ( Former IPL Chairman Rajeev Shukla Reached Taj Hotel ) अन्य पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे.

BNew BCCI President 2022
भारताचे माजी क्रिकेटपटू राॅजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सुरू झाली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी ( Former Indian Cricketer Roger Binny New BCCI President ), बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ), माजी IPL चेअरमन राजीव शुक्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ( Former IPL Chairman Rajeev Shukla Reached Taj Hotel ) मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ( AGM of BCCI at Taj Hotel in Mumbai ) पोहोचले आहेत. यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.

सर्वांची निवड बिनविरोध तसेच पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी नियोज : सर्वांची बिनविरोध निवड होणार याची खात्री असल्याने भावी पदाधिकाऱ्यांची निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे. परंतु, बीसीसीआयने आयसीसी अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करायचा की, विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना दुसऱ्यांदा पाठिंबा द्यायचा यावर सदस्य चर्चा करतील. पुढील वर्षी भारतात होणा-या एकदिवसीय विश्वचषकासाठी करात सूट देण्याबाबतही चर्चा होणार आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी केंद्र सरकारने आयसीसीला करात सूट दिली नाही, तर बीसीसीआयला ९५५ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

सौरव गांगुलीच्या नावाचा आयसीसीच्या सर्वोच्च पदासाठी विचार : आयसीसीच्या सर्वोच्च पदासाठी नामांकनाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. मेलबर्नमध्ये 11 ते 13 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. गांगुलीच्या बीसीसीआयमधून बाहेर पडल्याबद्दल केवळ क्रीडाच नव्हे तर राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली होती. आता या माजी कर्णधाराच्या नावाचा आयसीसीच्या सर्वोच्च पदासाठी विचार होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन निवडणूक लढवण्यास पात्र : क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. पण, बीसीसीआय त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना पाठिंबा देते का हे पाहावे लागेल. श्रीनिवासन यांचे वय ७८ वर्षे आहे. 12 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने ठाकूर आयसीसी बोर्डाच्या बैठकीत व्यस्त असण्याची शक्यता आहे.

बिन्नी हे बीसीसीआयच्या एजीएममध्ये गांगुलीच्या जागी बोर्डाचे अध्यक्षपद भूषवणार : बिन्नी बीसीसीआयच्या एजीएममध्ये गांगुलीच्या जागी बोर्डाचे अध्यक्षपद भूषवतील, तर माजी भारतीय कर्णधार बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून परतणार आहेत. बीसीसीआयच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव जय शाह, आशिष शेलार (कोषाध्यक्ष), राजीव शुक्ला (उपाध्यक्ष) आणि देवजीत सैकिया (सहसचिव) यांचा समावेश आहे. आउटगोइंग कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आयपीएलचे नवे अध्यक्ष असतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.