ETV Bharat / sports

WWC 2022 : ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय; सात विकेट्स राखून कॅरेबियन संघाला चारली धूळ

author img

By

Published : Mar 15, 2022, 5:40 PM IST

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या एकतर्फी साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव ( Australia Women won by 7 wkts ) केला. त्याचबरोबर आपले वर्चस्व कायम राखले. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांत चार विजयांसह आठ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

Australia
Australia

वेलिंग्टन : आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील चौदावा सामना मंगळवारी वेलिंग्टन येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज संघावर सात विकेट्सने मात केली. या विजयात एलिसे पेरी (3/22) आणि एशले गार्डनर (3/25) यांच्या शानदार गोलंदाजीचे योगदान महत्वपूर्ण ठरले.

या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने ( West Indies women's team ) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 45.5 षटकांत सर्वबाद 131 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाकडून स्टेफनी टेलरने सर्वाधिक धावा केल्या. तिने 91 चेंडूचा सामना करताना 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.

परंतु तिला संघातील इतर फलंदाजांकडून योग्य साथ मिळाली नाही. या संघातील इतर कोणत्याच फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला सन्मानजनक लक्ष्य उभारण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना एलिसे पेरी (3/22) आणि एशले गार्डनर (3/25) यांनी शानदार प्रदर्शन केले. त्याचबरोबर जोनासेनने 2 विकेट्स घेतल्या.

  • Australia's incredible bowling depth 😮

    Stafanie Taylor's heroics can't save West Indies 💥

    Rachael Haynes like a fine wine 🍷

    All the big talking points from another day at #CWC22 👇https://t.co/3mBh8ONjRV

    — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑस्ट्रेलिया महिला संघाने ( Australian women's team ) दमदार गोलंदाजी केल्यामुळे त्यांना 132 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलगा करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने सात धावांवर आपल्या दोन विकेट्स गमवाल्या होत्या. त्यानंतर या संघाची तिसरी विकेट्स 58 धावांवर एलिसे पेरीच्या रुपाने गेली. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया संघाने एक ही विकेट्स न गमावता, राचेल हेन्सच्या आणि बेथ मूनीच्या यांच्या अनुक्रमे 83 आणि 28 धावांच्या जोरावर आव्हान पूर्ण केले.

ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 118 चेंडू आणि 7 विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाकडून गोलंदाजी करताना हायले मॅथ्यूज, शमिला कोनेल आणि हेन्री यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली. मात्र या आपल्या संघाचा पराभव रोखू शकल्या नाहीत.

संक्षिप्त स्कोर:

वेस्टइंडीज 45.5 षटकांत 131 (स्टैफनी टेलर 50, एलिसे पेरी 3/22, एशले गार्डनर 3/25, जेस जोनासेन 2/18)

ऑस्ट्रेलिया 30.2 षटकांत 132/3 (रशेल हेन्स 83 नाबाद, बेथ मूनी 28 नाबाद).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.