ETV Bharat / sports

PAK Vs ZIM 2nd Test : अबिद अलीचे विक्रमी द्विशतक, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा पाकिस्तानी

author img

By

Published : May 8, 2021, 7:09 PM IST

पाकिस्तानचा फलंदाज अबिद अलीने झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले.

abid ali becomes-the-3rd-pakistani-to-score-a-test-double-hundred-versus-zimbabwe
PAK Vs ZIM 2nd Test : अबिद अलीचे विक्रमी द्विशतक, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा पाकिस्तानी

हरारे - पाकिस्तानचा फलंदाज अबिद अलीने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. त्याचे हे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावणारा अली पाकिस्तानचा तिसरा फलंदाज ठरला आहे. या आधी हा पराक्रम वसिम अक्रम आणि युनूस खान यांनी केला आहे.

अलीने ३९२ चेंडूचा सामना करत २०० धावा पूर्ण केला. द्विशतक झळकावणारा अली पाकिस्तानचा १०वा सलामीवीर ठरला आहे. यासोबत हरारेच्या स्टेडियममध्ये एका फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक दुसरी मोठी खेळी आहे. याआधी २००१-२००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू गॅरी क्रिस्टन याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात २२० धावांची खेळी केली होती.

आबिद अलीचे द्विशतक वगळता अझहर अलीने पाकिस्तानकडून पहिल्या डावात १२६ धावांची खेळी केली. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बाबर आझम फ्लॉप ठरला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. तो मागील सामन्यात देखील मोठी खेळी करू शकला नव्हता.

हेही वाचा - 'देशाअंतर्गत स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत होतो, पण प्रसिद्धी IPLमुळे मिळाली'

हेही वाचा - 'वजन कमी कर', टीम इंडियात पुनरागमनासाठी निवड समितीचा पृथ्वी शॉला सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.