ETV Bharat / sitara

टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती'चा येणार सिक्वेल, पोस्टर प्रदर्शित

author img

By

Published : Feb 28, 2020, 12:55 PM IST

साजीद नादियाडवाला हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर, अहमद खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Tiger Shroff in Heropanti 2, first look out
टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती'चा येणार सिक्वेल, पोस्टर प्रदर्शित

मुंबई - बॉलिवूडचा अ‌ॅक्शन हिरो टायगर श्रॉफ त्यांच्या दमदार अ‍ॅक्शन स्टंटसाठी लोकप्रिय आहे. त्याचा 'बागी ३' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटानंतर तो पुन्हा अ‌ॅक्शन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याचा 'हिरोपंती' या चित्रपटाचाही सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

साजीद नादियाडवाला हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर, अहमद खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

हेही वाचा -दिशा पाटणीचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस डान्स, पाहा 'बागी ३'चं गाणं

'हिरोपंती' चित्रपटातूनच टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉनची भूमिका होती. या चित्रपटानंतरच टायगर अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाऊ लागला.

आता 'हिरोपंती'च्या सिक्वेलमध्येही त्याचे दमदार स्टंट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज फर्स्ट लुक पोस्टरवरुन येतो. या चित्रपटात टायगर सोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार, हे जाहीर करण्यात आले नाही. लवकरच अभिनेत्रीची घोषणा करण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १६ जुलै २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर 'कायथी'च्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची वर्णी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.