ETV Bharat / sitara

रवीना टंडनचे इन्स्टाग्रामवर ५० लाख फॉलोअर्स, फॅन्सचे मानले आभार

author img

By

Published : Dec 17, 2020, 5:20 PM IST

अभिनेत्री रवीना टंडनचे इन्स्टाग्रामवर ५० लाख फॉलोअर्स झाले आहेत. तिने एक पोस्ट लिहून याबद्दल चाहत्यांचे आभार मानलेत. सध्या ती हिमाचल प्रदेशमध्ये शुटिंग करीत आहे.

Raveena Tandon
अभिनेत्री रवीना टंडन

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या 5 दशलक्ष ओलांडली आहे. यावेळी, अभिनेत्री रवीनाने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात ती बर्फात उडी मारताना दिसत आहे.

Raveena Tandon
रवीना टंडनचे इन्स्टाग्रामवर ५० लाख फॉलोअर्स

शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देताना रवीनाने लिहिलंय, "याला आनंदाने वेडे होणे म्हणतात. ५ दशलक्ष फॉलोअर्स. सर्वांना खूप प्रेम.''

दुसर्‍या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "आणि इंस्टाग्रामवर कुटुंब हळू हळू वाढत आहे."

हेही वाचा - कार्बन फुटप्रिंटबद्दल जागरुकता वाढवणार भूमी पडणेकर

रवीना अलिकडे हिमाचल प्रदेशमध्ये दर्जेदार वेळ घालवत आहे. इथे ती आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी आली आहे. तिचे इन्स्टाग्राम पाहल्याल लक्षात येते की इथल्या बर्फाळ पहाडांच्या सुंदर लोकेशन्सवर ती आनंद घेत आहे.

हेही वाचा - हॉट गुलाबी बिकनीमध्ये दिसली नुसरत भरुचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.