ETV Bharat / sitara

रसामध्ये नशेचे औषध मिसळून मॉडेलवर बलात्कार, प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून गैरवर्तन

author img

By

Published : Apr 14, 2021, 1:43 PM IST

Updated : Apr 14, 2021, 3:14 PM IST

मॉडेलचा फेसबुकवरुन नंबर मिळवून प्रमोद सतत तिच्याशी बोलायचा. यातून त्यांच्यात प्रेम घडले. पण याचा गैरफायदा घेत प्रमोदने मित्राच्या मदतीने मॉडेलवर बलात्कार केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे.

Rape by intoxicating juice of model
रसामध्ये नशेचे औषध मिसळून मॉडेलवर बलात्कार

बंगळुरू - एका मॉडेलवर तिचा बॉय फ्रेंड व त्याच्या मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. रसामध्ये नशेचे औषध मिसळून हे कृत्य करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

एक तरुण स्त्री मॉडेल म्हणून काम करत होती. तिच्यावर प्रेम करणारा प्रमोद तिला त्रास देत होता. फेसबुकच्या माध्यमातून नंबर मिळून तो सतत तिच्याशी बोलायचा. अशा प्रकारे ते प्रेमात पडले होते.

प्रमोदने त्या युवतीला तिच्याशी बोलायचे आहे असे सांगून यशवंतपुरा येथील लॉजमध्ये बोलावले. त्यानंतर त्याने तिला नशेचे औषध मिसळलेला रस पाजला. त्यानंतर प्रमोद आमि त्याचा मित्र धनंजय याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या युवतीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरुन प्रसारित करण्याची धमकी दिली. अशा पध्दतीने पीडितेला धमकावून १८ वेळा लैंगिक अत्याचार केले गेले.

एका युवतीने यशवंतपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस आता आरोपी प्रमोद आणि धनंजय याला पकडण्यासाठी सापळा रचत आहेत.

हेही वाचा - सर्वांनी घरी राहून आंबेडकर जयंती साजरी करा, मराठी कलाकारांकडून आवाहन

Last Updated : Apr 14, 2021, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.