ETV Bharat / sitara

'पाठकबाईं'साठी आ.रोहित पवार 'राणादा'.. जामखेड होणार स्वच्छ, सुंदर,हरित शहर

author img

By

Published : Feb 17, 2021, 2:27 PM IST

जामखेड शहर स्वच्छ,सुंदर आणि हरित करण्यासाठी उपक्रमाचा शुभारंभ अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते करण्यात आला. नागरिकांनी आपले शहर हे सुंदर, स्वच्छ आणि हिरवाईने नटलेले असावे या साठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे असे देवधर म्हणाल्या.

MLA Rohit Pawar 'Ranada' for 'Pathakbai'
'पाठकबाईं'साठी आ.रोहित पवार 'राणादा'

अहमदनगर- आ. रोहित पवार यांच्या कामाचा धडाका पाहता ते स्वच्छ-सुंदर कर्जत नंतर जामखेड शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर करतील. ज्या प्रमाणे आमच्या मालिकेत अंजली सरपंच झाल्या नंतर तिच्या पाठीमागे राणादा उभे राहतात, तसेच रोहित दादा जामखेडच्या विकासासाठी राणादाच्या भूमिकेत काम करतील असा विश्वास टीव्ही सिरिअल मधून पाठकबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री अक्षया देवधर यांनी व्यक्त केला.

'पाठकबाईं'साठी आ.रोहित पवार 'राणादा'

जामखेड शहराचा होणार कायापालट-

जामखेड शहर स्वच्छ,सुंदर आणि हरित करण्यासाठी उपक्रमाचा शुभारंभ अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते करण्यात आला. कर्जत-जामखेडचे आ.रोहित पवार यांनी गेल्या तीन महिन्यापासून कर्जत शहरात स्वच्छ-सुंदर कर्जत शहर उपक्रमात सहभागी होत काम केले होते. कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभागी होत सलग शंभर दिवस शहर स्वच्छता, वृक्ष लागवड आदी उपक्रम राबवले. त्याच धर्तीवर आता आ.रोहित पवार यांनी जामखेड शहरात काम सुरू केले आहे.

स्वतः पुढाकार घेत उपक्रमात सहभागी व्हा-

नागरिकांनी आपले शहर हे सुंदर, स्वच्छ आणि हिरवाईने नटलेले असावे या साठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे असे देवधर म्हणाल्या. इतरांना सांगू नका तर स्वतःच पुढाकार घेत या उपक्रमात सहभागी व्हा. एकीच्या बळाने हे काम होणार आहे मात्र सुरुवात स्वतः पासून करा म्हणजे वाद होत नसतात. आ.रोहित यांचे काम मी पाहिलेले आहे. विविध कामात ते अगोदर स्वतःला झोकून देतात, त्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे. आम्ही अभिनेते आमच्या मालिकांमधून अनेक सामाजिक संदेश देत असतो. माझ्या मालिकेत अंजली सरपंच झाल्या नंतर पत्नीच्या मागे राणादा खंबीरपणे उभे राहतात. आ.रोहित यांची कामाची धडाडी पाहता ते कर्जत-जामखेडचे राणादा आहेत. ते नक्कीच जामखेड शहराचा कायापालट करतील अशी प्रशंसा देवधर यांनी यावेळी केली.

कटोरे मे चिंगम रोहितदादा सिंघम-

आ.रोहित पवारांनी यावेळी बोलताना आपल्याला निवडणूक काळात सर्व स्थरातील नागरिकांनी साथ दिली. त्यामुळे आता या मतदारसंघाचा आणि त्यातील शहरांचा कायापालट करायचा आहे. जामखेडमध्ये एकही उद्यान नाही, धड रस्ते नाहीत. या सर्व नागरी सुविधा मतदारसंघात करण्याचे नियोजन असून त्यासाठी कामे सुरू झालेली आहेत. निवडणूकित लहान मुलांनी पण माझ्यासाठी काम केले. त्यावेळी त्यांचा नारा होता, कटोरे मे चिंगम रोहितदादा सिंघम. शासनाकडून निधी आणण्याचे काम आपण करूच पण अनेक कामात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आवश्यक असतो तो मिळत असल्याने काही दिवसांत जामखेडचा चेहरा-मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - रिक्शा ड्रायव्हरची मुलगी असलेल्या मन्या सिंगचे रिक्शा रॅलीने स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.