ETV Bharat / sitara

सर्वात मोठ्या 'भीती'चा करण जोहरने केला खुलासा

author img

By

Published : Aug 2, 2021, 8:26 PM IST

बॉलिवूड निर्माता करण जोहर बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे म्हणणे आहे की त्याची मुले रुही आणि यश यांच्या पासून दूर राहण्याची त्याला भीती वाटत आहे.

Karan Johar reveals the biggest 'fear'
बॉलिवूड निर्माता करण जोहर

मुंबई - चित्रपट निर्माता करण जोहर 'बिग बॉस ओटीटी' होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र हे काम सुरू करण्यापूर्वी त्याला मोठी भीती वाटत आहे. तो म्हणतो की, रुही आणि यश या त्याच्या मुलांपासून दूर राहण्याची त्याला सर्वात मोठी भीती वाटत आहे. आपल्या मुलांविषयी बोलताना करण म्हणाला, '"माझा सर्वात मोठा FOMO (भीती) माझ्या मुलांपासून दूर राहणे आहे, ते माझ्या आनंदाचे स्त्रोत आहेत. जास्त काळ त्यांच्यापसून दूर राहणे मी सहन करीत नाही."

Karan Johar reveals the biggest 'fear'
करण जोहरचे मुले रुही आणि यश

करण 'बिग बॉस ओटीटी'च्या सहा आठवडे इतक्या दीर्घ काळ चालणाऱ्या शोचे तो सूत्रसंचालन करण्यासाठी तयार आहे. हा शो 8 ऑगस्टपासून वूटवर प्रसारित होणार आहे. शोची पहिली स्पर्धक पार्श्वगायिका नेहा भसीन आहे. जिने 'जग घूमिया', 'स्वैग से स्वागत' आणि 'नई जाना' यासारख्या चित्रपटांसाठी गायन केले आहे. डिजिटल एक्सक्लूसिव पूर्ण झाल्यानंतर बिग बॉस सिझन 15 कलर्सवर लॉन्च होईल, ज्याचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे.

हेही वाचा - अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ आता दिसणार 3D मध्ये!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.