ETV Bharat / sitara

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हॉलिवूड अभिनेत्री अमांडा सेर्नीसोबत करणार व्हिडिओ पॉडकास्ट शो!

author img

By

Published : Aug 20, 2020, 4:30 PM IST

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि हॉलिवूड अभिनेत्री अमांडा सेर्नी आता एका नव्या पॉडकास्ट शोसाठी सज्ज झाल्या आहेत. 'फील्स गुड' असे शीर्षक असलेल्या या शोमध्ये जगभरातील प्रेरणादायी बातम्या, काही गोष्टीची समीक्षा आणि काही अनपेक्षित पाहुण्यांसोबतच्या भेटीगाठीही असतील. या शोमध्ये डेटिंग, वेलनेस आणि देशोदेशीच्या संस्कृती बद्दल चर्चा होणार असून यातील कंटेंट प्रेक्षकांना सकारात्मकतेची अनुभूती देणारा असेल.

Jacqueline Fernandez with Amanda Cerni
अमांडा कर्नीसह जॅकलिन फर्नांडिज

मुंबई - अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने एव्हाना इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर 90 मिलियनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून ती आता एका नव्या पॉडकास्ट शोसाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, नेटकऱ्यांमध्ये जॅकलिनची 'हरवलेली बहिणी' म्हणून कायम चर्चेत असलेली हॉलिवूड अभिनेत्री अमांडा सेर्नी या शोमध्ये जॅकलिनसोबत दिसणार आहे.

अमांडाचे देखील यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 45 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असून अमांडा हॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जॅकलीन अमांडाच्या या नव्या पॉडकास्ट व्हिडिओ शोचे नाव असणार आहे 'फील्स गुड' ज्यामध्ये जगभरातील प्रेरणादायी बातम्या, काही गोष्टीची समीक्षा आणि काही अनपेक्षित पाहुण्यांसोबतच्या भेटीगाठीही असतील. या शोमध्ये डेटिंग, वेलनेस आणि देशोदेशीच्या संस्कृती बद्दल चर्चा होणार असून यातील कंटेंट प्रेक्षकांना सकारात्मकतेची अनुभूती देणारा असेल. या शोची घोषणा पॉडकास्ट मंचावरील प्रसिद्ध 'पॉडकास्ट वन'द्वारे करण्यात आली आहे.

या शो विषयी बोलताना जॅकलिन आणि अमांडा म्हणाल्या की,"आम्ही जे काही करतो ते आम्हाला आवडते आहे आणि वेलनेस, संस्कृति, डेटिंग, सकारात्मक बातम्यांसोबत कधी कधी अनपेक्षित पाहुणे देखील या नव्या मंचावर येणार असल्याने आम्हाला हे माध्यम फारच उत्साही आणि आनंददायक वाटते आहे."जॅकलिन फर्नांडीस भारतीय चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचे नाव असून तिचे उत्तम काम ही आज तिची ओळख आहे. ही ओळख केवळ व्यावसायिक चित्रपटांच्या यशपर्यंतच मर्यादित नसून या अभिनेत्रीने ब्रँड सर्किटमध्ये देखील आपली खास जागा निर्माण केली आहे. जॅकलिन कायमच आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाने सर्वांना प्रेरित करत असते, त्यामुळेच तिला बॉलिवूड मधील 'सनशाइन गर्ल' असंही म्हटल जात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.