ETV Bharat / sitara

'कोण होणार करोडपती'मध्ये ‘प्ले अलॉन्ग’ वर रोज प्रेक्षकही होणार लक्षाधिश

author img

By

Published : Jul 12, 2021, 10:34 PM IST

Sachin Khedekar
सचिन खेडेकर

‘कौन बनेगा करोडपती’ भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. मराठी भाषेतसुद्धा याची निर्मिती करण्यात आली, 'कोण होणार करोडपती' नावाने. पहिला सिझन झाल्यावर कोरोनामुळे ‘गॅप’ पडला परंतु यावर्षी तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय. यावर्षी ‘कोण होणार करोडपती’ चे सूत्रसंचालन करणार आहेत जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर.

‘हू वॉण्टस टू बी अ मिलनेयर’ चा हिंदी अवतार ‘कौन बनेगा करोडपती’ भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. त्यामुळेच तो प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा असावा अशी मागणी होऊ लागली. त्यामुळेच मराठी भाषेतसुद्धा याची निर्मिती करण्यात आली, 'कोण होणार करोडपती' नावाने. पहिला सिझन झाल्यावर कोरोनामुळे ‘गॅप’ पडला परंतु यावर्षी तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय. यावर्षी ‘कोण होणार करोडपती’ चे सूत्रसंचालन करणार आहेत जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर.

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती. या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्य आहे, 'आता फक्त ज्ञानाची साथ' आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ शकता. आता झटपट लखपती बनण्याची संधी 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. एक नामी संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.

हा कार्यक्रम पाहताना प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.- शनि., रात्री ९ वा. 'कोण होणार करोडपती' पाहता-पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं ‘प्ले अलॉंग’ वर देऊन प्रेक्षक जिंकू शकतात १ लाख रुपये. तुमच्या ज्ञानाच्या जोरावर प्रेक्षक घरात बसून आणि या खेळात निवांत सहभागी होऊन लखपती होऊ शकतात. हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते म्हणजे तुमचं ज्ञान.

'कोण होणार करोडपती', हा कार्यक्रम १२ जुलैपासून रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.

हेही वाचा - ''मराठा सिर्फ दो ही बात जानता है...मारना या मरना'': ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.