ETV Bharat / sitara

हरनाझच्या कुटुंबीयांची जंगी स्वागताची तयारी

author img

By

Published : Dec 16, 2021, 10:26 PM IST

आमचे प्रतिनिधी जेव्हा हरनाझच्या घरी माहिती घेण्यासाठी पोहोचले तेव्हा घरी अभिनंदन करणाऱ्यांची खूप गर्दी होती. हरनाझच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलसह इतर प्राध्यापक घरी अभिनंदनासाठी पोहोचले होते. हरनाझ अद्याप घरी पोहोचलेली नाही. परंतु ती जेव्हा येईल तेव्हा मोठे स्वागत केले जाणार असल्याचे भाऊ हरनूर संधूने सांगितले.

हरनाझच्या कुटुंबीयांची जंगी स्वागताची तयारी
हरनाझच्या कुटुंबीयांची जंगी स्वागताची तयारी

चंदिगढ - मिस युनिव्हर्स हरनाझ संधूला जागतिक किताब मिळाल्यानंतर तिच्या घरी अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. संपूर्ण पंजाबला तर आनंद झालाच आहे पण देशातून आणि विदेशातूनही अभिनंदन होत असल्याचे तिचा भाऊ हरनूर संधूने सांगितले.

आमचे प्रतिनिधी जेव्हा हरनाझच्या घरी माहिती घेण्यासाठी पोहोचले तेव्हा घरी अभिनंदन करणाऱ्यांची खूप गर्दी होती. हरनाझच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलसह इतर प्राध्यापक घरी अभिनंदनासाठी पोहोचले होते. हरनाझ अद्याप घरी पोहोचलेली नाही. परंतु ती जेव्हा येईल तेव्हा मोठे स्वागत केले जाणार असल्याचे भाऊ हरनूर संधूने सांगितले.

हरनाझचे वडील व्यावसायिक आहेत तर आई पेशाने डॉक्टर आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. आमच्या प्रतिनिधीने आई व भावाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

हरनाझच्या कुटुंबीयांची जंगी स्वागताची तयारी

विश्वसुंदरी हरनाझ

पंजाबची सौंदर्यवती हरनाझ ही विश्वसुंदरी 2021 (Miss Universe 2021) ठरली आहे. इस्रायलमधील इयालत येथे मिस युनिव्हर्स 2021 ची घोषणा झाली. मेक्सिकोची अँड्रिया मेझाने मिस युनिव्हर्स हरनाझ संधूच्या डोक्यावर मुकुट घातला.

लारा दत्तानंतर 21 वर्षांनी मिळाला भारताला विश्वसुंदरी बनण्याचा मान

जगभरातील सौदर्यंवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तब्बल 21 वर्षांनंतर भारताने ‘मिस युनिव्हर्स 2021’ किताब जिंकला आहे. यापूर्वी 2000 मध्ये लारा दत्तानेमध्ये ‘मिस युनिव्हर्स 2021’ पटकावले होते.

हरनाझला अभिनयाची आहे आवड

चंदिगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. हरनाझने कमी वयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. हरनाझ पेशाने मॉडेल तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझने हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात काम केले आहे.

हरनाझने मिळवलेले किताब -

2017 मध्ये हरनाझने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. तर 2018 मध्ये, हरनाझला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया 2018 चा अवॉर्ड मिळाला होता. यानंतर हरनाझने मिस इंडिया 2019 मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप 12 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया 2021 चा मुकुट पटकावला होता. आता तिने थेट ‘मिस युनिव्हर्स 2021’ चा किताब पटकावला आहे.

हेही वाचा - Harnaz Sandhu Quarantine : मिस यूनिवर्स हरनाझ संधू मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.