ETV Bharat / sitara

दिग्दर्शक मधुर भांडाकरने घेतली नीरज चोप्रा आणि मीराबाई चानूची भेट, बायोपिकच्या चर्चेला उधाण

author img

By

Published : Aug 19, 2021, 6:58 PM IST

या वर्षी नीरज चोप्राने भारतासाठी पहिले सुवर्णपदक आणले आणि मीराबाई चानूने तिच्या आश्चर्यकारक कामगिरीने देशासाठी रौप्य पदक जिंकले. या दोन्ही खेळाडूंची दिग्दर्शक मधुर भांडाकरने भेट घेतली आणि चर्चा केली. त्यानंतर या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट बनवले जाणार असल्याचे चर्चा रंगू लागली आहे.

बायोपिकच्या चर्चेला उधाण
बायोपिकच्या चर्चेला उधाण

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा गौरव ठरलेले नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांचा बायोपिक पाहायला देशवासियांना नक्की आवडेल. पण अशा चित्रपट बनू शकतो का? याचे उत्तर होय असेच गृहित धरूयात. कारण बॉलिवूडचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक माधुर भांडारकर याने नुकतीच नीरज चोप्रा आणि माराबाई चानू यांची भेट घेतली होती.

दोन्ही खेळाडूंसोबतचे मधुर भांडाकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये मधुर भांडारकर नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांच्यासोबत बसून बोलताना आणि फोटोंसाठी पोझ देताना दिसत आहे. देशातील या दिग्गज खेळाडूंसह मधुर भांडारकरचे फोटो प्रसिध्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या बायोपिकची चर्चा सुरू झाली आहे.

मधुर भांडारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू भेटीचे हे फोटो शेअर केले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी बायोपिकबद्दल लिहायला सुरुवात केली आहे. चाहत्यांनी मधुर बायोपिक बनवणार असल्याचे तर्क सुरू केले आहेत.

या वर्षी नीरज चोप्राने भारतासाठी पहिले सुवर्णपदक आणले आणि मीराबाई चानूने तिच्या आश्चर्यकारक कामगिरीने देशासाठी रौप्य पदक जिंकले. दोन्ही खेळाडूंना देशाचे अपार प्रेम मिळाले आहे. आता प्रेक्षकांना त्यांचा बायोपिक चित्रपट पाहायला मिळेल का हे पाहावे लागेल. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा -सुपरमॉडेल ऑफ दि इअर 'सीझन २’चे परिक्षण करणार मलायका अरोरा, मिलिंद सोमण व अनुषा दांडेकर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.