ETV Bharat / sitara

‘मन उडू उडू झालं'साठी रीना मधुकरला हिंदी इंडस्ट्रीकडून शुभेच्छा!

author img

By

Published : Sep 11, 2021, 5:00 PM IST

रीना अगरवाल ही अभिनेत्री हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. ती आता झी मराठी वरील नवीन मालिका ‘मन उडू उडू झालं' मध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. ती आता रीना मधुकर म्हणू ओळखली जातेय. या नवीन भूमिकेत तिचं सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसतेय.

रीना मधुकरला हिंदी इंडस्ट्रीकडून शुभेच्छा!
रीना मधुकरला हिंदी इंडस्ट्रीकडून शुभेच्छा!

मनोरंजनसृष्टीत नावाला खूप महत्व दिले जाते. म्हणजे ‘नाव’ असलेला कलाकार तेजीत असतो आणि काही कलाकार प्रसिद्धी मिळविल्यावर सुद्धा आपल्या नावात छोटेमोठे बदल करीत असतात. रीना अगरवाल ही अभिनेत्री हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून ती आता झी मराठी वरील नवीन मालिका ‘मन उडू उडू झालं' मध्ये महत्वाची भूमिका साकारत असून ती आता रीना मधुकर म्हणू ओळखली जातेय. आणि या नवीन भूमिकेत तिचं सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसतेय.

रीना मधुकरला हिंदी इंडस्ट्रीकडून शुभेच्छा!
रीना मधुकरला हिंदी इंडस्ट्रीकडून शुभेच्छा!

आपल्या मराठमोळ्या रीनाने तिच्या अभिनयाची सुरुवात जरी हिंदी मधून केली असली तरी हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्री सोबत तिने एक छान नातं जपलं आहे आणि त्याचा अनुभव नुकताच सर्वांनी अनुभवला जेव्हा रीनाच्या पहिल्या मराठी मालिकेला म्हणजेच 'मन उडू उडू झालं' ला हिंदी इंडस्ट्रीमधील तिच्या मित्र परिवाराने मनापासून शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री अर्चना पुरन सिंह, स्क्रिन रायटर किरण कोट्रियाल, निर्माते रमेश तौरानी, अभिनेत्री रुपाली गांगुली, कोरिओग्राफर- क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री चहल आदी हिंदी इंडस्ट्रीमधील मान्यवरांनी रीनाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले.

रीना मधुकरला हिंदी इंडस्ट्रीकडून शुभेच्छा!
रीना मधुकरला हिंदी इंडस्ट्रीकडून शुभेच्छा!

हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये अभिनेत्री रीना मधुकरने वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन देखील झालेच पण त्यांना तिच्या हर एक भूमिकेत नाविन्य पाहायला मिळालं म्हणूनच रीनाचे फॅन्स तिच्यावर आणि तिच्या भूमिकांवर जीवापाड प्रेम करतात. रीना झी मराठीवरील मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत ती सानिका देशपांडे ची भूमिका साकारत आहे जी नायिका साकारत असेल्या हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे.

रीना मधुकरची भूमिका असलेली ‘मन उडू उडू झालं' ही मालिका प्रसारित होते झी मराठीवर संध्या. ७ वा.
हेही वाचा - या उद्योगपतीच्या बायोपिकसाठी गुलजार-रहमान पुन्हा येणार एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.