ETV Bharat / sitara

मलायका अरोराने रक्षाबंधनानिमित्य बहिण अमृताला लिहिली भावनिक चिठ्ठी

author img

By

Published : Aug 3, 2020, 1:51 PM IST

रक्षाबंधनाच्या निमित्ताने अभिनेत्री मलाइका अरोराने आपल्या लहान बहिण अमृता अरोरासाठी मनापासून पोस्ट शेअर केली आणि बहिणीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे.

Malaika Arora
अभिनेत्री मलाइका अरोरा

मुंबईः अभिनेत्री मलाइका अरोरा हिने तिच्या आयुष्यात भावासारख्या अनेक भूमिका पार पाडलेल्या बहिण अमृता अरोरासाठी कौतुक करीत रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे.

मलायकाने बहिणीसोबतचा एक विशेष फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने बहिणीचे कौतुक केले आहे.

तिने “तूम्ही हो बंधू, सखा तुम ही” या गाजलेल्या ओळी लिहून चिठ्ठीची सुरूवात केली आहे. त्यानंतर तिने लहान बहिणीबद्दल असलेल्य आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: वरिष्ठ आयपीएस अधिकारी बिहार पोलिसांच्या तपास पथकाच्या मदतीसाठी मुंबईत

"तुम्ही हो बन्धु, सखा तुम ही '. ही फक्त प्रार्थनाच नाही, हे फक्त एक गाणे नाही ... ही आमच्या नात्याबद्दलची व्याख्या आहे. तू फक्त माझी लहान बहिण नाहीस, मला जेव्हा गरज असते तेव्हा तू माझी चागली मैत्रीण आहेस, जेव्ही मी मुलासारखे वाटते तेव्हा तू माझी मोठी बहिण असतेस, तर कधी तू माझ्यासाठी भावासारखी असतेस, यातील काहीच मला हरवायचे नाही., असे तिने लिहिलंय.

"आम्ही एकमेकींकरिता सर्वकाही आहोत आणि आमच्या शाश्वत बंधनाचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतात. रक्षाबंधनाच्या तुला शुभेच्छा! माझ्या आयुष्यात... एक बहिण, एक भाऊ, एक मित्र आणि बर्‍याच भूमिका बजावल्या आहेस," असे ती पुढे म्हणते.

तिने बहिणी, भाऊ, मित्र आणि अशा बर्‍याच भूमिका बजावल्या बद्दल मलायकाने अमृताचे आभार मानले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.