ETV Bharat / sitara

राम गोपाल वर्माचे अभिनेत्रींना कवटाळत डान्स करतानाचे दोन व्हिडिओ व्हायरल!

author img

By

Published : Aug 26, 2021, 3:43 PM IST

निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. आता त्याचा दुसरा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. दोन्ही व्हिडीओमध्ये तो मनोरंजनसृष्टीतील वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत डान्स करताना दिसतोय.दोनेक दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरजीव्ही (राम गोपाल वर्मा) अभिनेत्री इनाया सुलतानीसोबत तिला कवटाळत नृत्य करताना दिसत आहे. इनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील तो प्रसंग असून आरजीव्ही नशेत असल्यासारखे वाटत आहे.

Ram Gopal Varma's dance with Inaya Sultana
राम गोपाल वर्माचे डान्स व्हिडिओ व्हायरल

निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. आता त्याचा दुसरा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. दोन्ही व्हिडीओमध्ये तो मनोरंजनसृष्टीतील वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत डान्स करताना दिसतोय आणि मद्यधुंद असल्यासारखे वाटते आहे. एका व्हिडिओत तो दारूचा ग्लास घेऊनच डान्स करीत असल्यामुळे त्याच्या ‘त्या’ अवस्थेला दुजोराच मिळतो.

दोनेक दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरजीव्ही (राम गोपाल वर्मा) अभिनेत्री इनाया सुलतानीसोबत तिला कवटाळत नृत्य करताना दिसत आहे. इनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील तो प्रसंग असून आरजीव्ही नशेत असल्यासारखे वाटत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटिझन्सने आरजीव्हीवर बरेच तोंडसुख घेतले. कॉंट्रोव्हर्सीजचा बादशाह असणाऱ्या आरजीव्ही वर त्याचा काहीही फरक झालेला दिसत नाही कारण त्याने आपल्या विचित्र शैलीत उत्तर देताना समाज माध्यमावर लिहिले की, “मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचे आहे की या व्हिडिओतील माणूस मी नाही आणि लाल रंगाच्या ड्रेसमधील मुलगी @inaya_sultana नाही आणि मी हे अमेरिकन अध्यक्ष JOE BIDEN ची शपथ घेत सांगतोय."

परंतु अभिनेत्री इनाया सुलतानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल वर ती तिचीच पार्टी असल्याचे पोस्ट केले.

थोडक्यात तिच्यासोबत चिकटून डान्स करताना व्हिडिओत दिसणारा माणूस राम गोपाल वर्मा असल्याची पुष्टी मिळते. त्याच पार्टीमधील आरजीव्ही चा मद्यधुंद अवस्थेत दुसऱ्या एका अभिनेत्रींसोबत, तिच्यासोबत लगट करीत, डान्स करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याला भरपूर फटकारले आहे. यावेळी तो अभिनेत्री ज्योतीसोबत नृत्य करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये, आरजीव्ही आणि ज्योती त्याच्या लोकप्रिय हिट चित्रपट ‘रंगीला’ च्या एका गाण्यावर एकमेकांना कवटाळत नृत्य करीत आहेत. असे वाटते की हा दिग्दर्शक दारूच्या नशेत होता कारण त्याने हातात दारूने भरलेला ग्लास धरला होता, कदाचित. नेटिझन्स इंटरनेटवर असभ्य आणि घृणास्पद टिप्पण्यांद्वारे दिग्दर्शकाला ट्रोल करत आहेत.

दरम्यान, रामूने ट्विटरवर मात्र व्हायरल व्हिडिओतील आपली डान्स पार्टनर इनाया सुल्तानाच असल्याचे म्हटले आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री इनाया सुल्तानासोबत राम गोपाल वर्माच्या हॉट आणि रोमँटिक डान्सच्या आणि अभिनेत्री ज्योतीसोबत कवटाळून डान्स करतानाच्या व्हिडीओजना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा - अभिनेत्री नुसरत जहांने दिला बाळाला जन्म; पती निखिल जैन म्हणाले होते, हे बाळ माझे नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.