ETV Bharat / sitara

शुभंकर तावडे फिल्मफेअरच्या ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्काराने सन्मानित!

author img

By

Published : Mar 2, 2021, 5:29 PM IST

‘कागर’ चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची घोडदौड सुरू करणाऱ्या अभिनेता शुभंकर तावडेवर त्याच्या अभिनयासाठी कौतुकाचा सातत्याने वर्षाव झाला. आता ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरने ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.

Shubhankar Tawde
शुभंकर तावडे

मुंबई - आपले अभिनेते वडील सुनील तावडे यांचा वारसा पुढे नेणारा अभिनेता शुभंकर तावडे सध्या अत्यानंदित आहे. कारणही तसेच आहे, त्याला फिल्मफेअरची ‘ब्लॅक लेडी’ मिळालीय. २०१९ ला रिलीज झालेल्या ‘कागर’ चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची घोडदौड सुरू करणा-या अभिनेता शुभंकर तावडेवर त्याच्या अभिनयासाठी कौतुकाचा सातत्याने वर्षाव झाला. आता ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरने ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.

Shubhankar Tawde
शुभंकर तावडे
आपल्या पहिल्या-वहिल्या चित्रपटासाठी पहिला वाहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने भारावलेला शुभंकर तावडे प्रतिक्रिया देताना म्हणाला, “फिल्मफेअर पुरस्काराची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणं, हे खूपच अभिमानाचं आणि स्वप्नवत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या प्रत्येक अभिनेत्याचे हे स्वप्न असतं. आज हे स्वप्न सत्यात उतरताना अतिशय आनंद होतोय.”राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने ‘कागर’ साठी एकत्र आले होते व त्यांच्या छत्रछायेत नवोदित शुभंकरने आपले अभिनयाचे नाणे खणखणीतपणे वाजविले होते. तो म्हणाला, “मला कागरचे दिग्दर्शक मकरंद माने यांचे खूप आभार मानावेसे वाटत आहेत. कारण, माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्यामध्ये त्यांनी कागरमधला हिरो पाहिला. मी सिनेमातला हिरो बनू शकतो. हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. माझ्या वडिलांचे (अभिनेता सुनील तावडे) मार्गदर्शनही मला सातत्याने मिळत गेल्याने मी आजवर इथवर पोहोचलो. सर्वात महत्वाचे म्हणजे, मला हा पुरस्कार मिळण्यात प्रेक्षकांचा मोठ वाटा आहे. त्यामुळे त्यांचेही आभार.” ‘कागर’ साठी शुभंकर तावडेला यंदाचा ‘बेस्ट डेब्यू फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा - हॅप्पी बर्थ डे टायगर श्रॉफ : बागी ते रॅम्बो पर्यंतचा अॅक्शन प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.