ETV Bharat / sitara

...म्हणून शिल्पा शेट्टीने नाकारली तब्बल १० कोटीची ऑफर

author img

By

Published : Aug 18, 2019, 8:13 AM IST

शिल्पा सध्या छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमाचे परिक्षण करत आहे. लवकरच ती मोठ्या पडद्यावरही पुनरागमन करत आहे. तब्बल १३ वर्षानंतर ती एका चित्रपटात झळकणार आहे.

...म्हणून शिल्पा शेट्टीने नाकारली तब्बल १० कोटीची ऑफर

मुंबई - बॉलिवूडची फिटनेस क्विन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी ओळखली जाते. योगाच्या माध्यमातून आणि योग्य आहारामुळे तिने स्वत:ला फिट ठेवले आहे. तिच्या फिटनेसचे गुपीत जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. तिच्या फिटनेसची हिच क्रेझ पाहून एका जाहिरात कंपनीने शिल्पाला १० कोटींची ऑफर दिली होती. मात्र, शिल्पाने ती नाकारली आहे.

होय, शिल्पाला फिटनेससाठी आणि वजन घटवण्यासाठी असलेल्या आयुर्वेदिक गोळ्यांची जाहिरात ऑफर करण्यात आली होती. मात्र, शिल्पाने ही जाहिरात करण्यास नकार दिला आहे. 'मी ज्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाही, ती गोष्ट मी विकु शकत नाही', असे तिने म्हटलंय.

'वजन घटवणाऱ्या गोळ्या काही दिवसात वजन घटवतात. मात्र, त्याचा आरोग्यावरही परणाम होऊ शकतो. आपला चांगला आहार आणि चांगली जीवनशैली असेल, तर आरोग्यही चांगले राहु शकते', असेही ती पुढे म्हणाली.

शिल्पा सध्या छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमाचे परिक्षण करत आहे. लवकरच ती मोठ्या पडद्यावरही पुनरागमन करत आहे. तब्बल १३ वर्षानंतर ती एका चित्रपटात झळकणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.