ETV Bharat / sitara

'द मॅन हू किल गांधी'च्या पोस्टरवर टीका करणाऱ्यांना राम गोपाल वर्माचे सडेतोड उत्तर

author img

By

Published : Jun 12, 2020, 2:54 PM IST

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा याच्या आगामी 'द मॅन हू किल गांधी' या चित्रपटाच्या पोस्टरवर टीकेची झोड उठविली गेली आहे. या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून, आरजीव्हीने टीका करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यापूर्वी निष्कर्ष काढू नये असा सल्ला दिलाय.

The Man Who Killed Gandhi poster
'द मॅन हू किल गांधी

मुंबई: लॉकडाऊन दरम्यान 'कोरोना व्हायरस' नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण करणारे चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा 'द मॅन हू किल गांधी' या नावाने आणखी एक चित्रपट तयार केला आहे. आगामी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गांधी आणि नथुराम गोडसे यांचे चेहरे एकत्रित केल्याबद्दल रामूवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

मानवतावादी बाबू गोगिनेनी यांनी पोस्टरसाठी आरजीव्हीवर टीका करताना अपमानकारक म्हटले आहे. आपल्या प्रदीर्घ फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी दिग्दर्शकाला 'पोस्टर मागे घे' अशी विनंतीदेखील केली आहे. कारण अशा गोष्टीमध्ये “निर्णय आणि अचूकपणा” नसतो असेही म्हटलंय. तथापि, नेटिझन्स आणि गोगिनेनी काय म्हणत आहेत हे राम गोपाल वर्माने स्पष्ट उत्तर न देता चित्रपट पाहून निष्कर्ष काढावा असा सल्ला दिलाय.

  • The intention of the morph will be understood in the final film and i am within my rights to exercise my artistic vision like u are in offending God believers..Its not right on ur part to jump the gun even before u see final product.I suggest u take a chill pill and have a beer. pic.twitter.com/yuOp9v3vaJ

    — Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

''पोस्टर मॉर्फ करण्याचा हेतु चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. माझ्या कलात्मक दृष्टीचा उपयोग करणे माझ्या अधिकारात आहे. जसे की देवावर विश्वास ठेवणेदेखील काहींना अपमानास्पद वाटत असेत. अंतिमतः चित्रपट न पाहता हवेत गोळीबार करणे योग्य नाही. तुम्ही एक थंड व्हायची गोळी घ्या आणि बियर घ्या.'', असे उत्तर गोगिनेनी यांना राम गोपाल वर्माने दिलंय.

  • Freedom of speech and expression is intended to be protected from those who get offended ..if nobody gets offended you won’t need it.

    — Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसर्‍या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्माने लिहिलंय, "बोलण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असे आहे की, जे नाराज आहेत त्यांच्यापासून संरक्षित व्हावे .. जर कोणी रागावलेले नसेल तर आपल्याला याची आवश्यकता नाही."

सत्य, कंपनी, शूल, सरकार आणि 'रात आणि भूत' यासारख्या भयपट चित्रपटांमुळे राम गोपाल वर्मा एकेकाळी नव्या काळातील सिनेमाचा अग्रणी मानला जात असे. त्याचा अगदी अलिकडील सिनेसृष्टीत इतका प्रभाव राहिलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.