ETV Bharat / sitara

लतादीदींची प्रकृती स्थिर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर घेताहेत दीदींची काळजी

author img

By

Published : Nov 12, 2019, 10:24 PM IST

लतादीदींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने अतीदक्षता विभागात भरती करण्यात आलं होतं. त्यांची काळजी घेण्यासाठी आशा भोसले आणि उषा मंगेशकर या रुग्णालयात आल्या आहेत.

लतादीदींची प्रकृती स्थिर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर घेताहेत दिदींची काळजी

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याच कळत आहे. रविवारी (१० नोव्हेंबर) मध्यरात्री अचानक त्यांना श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

लतादीदींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने अतीदक्षता विभागात भरती करण्यात आलं होतं. त्यांची काळजी घेण्यासाठी आशा भोसले आणि उषा मंगेशकर या रुग्णालयात आल्या आहेत. सध्या आशाताई, उषाताई, आदिनाथ मंगेशकर त्यांची काळजी घेत आहेत.

लतादिदींची प्रकृती स्थिर

हेही वाचा -हेमा मालिनी आणि शबाना आझमी यांनी लताजींच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना

त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली तर लगेच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.

Intro:(मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेतला वोक थ्रू पाठवत आहे. नॅशनल ला सुद्धा द्यावा.)

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याच कळतंय. रविवारी मध्यरात्री अचानक श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल कराव लागलं होतं. त्यांना ताबडतोब आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्याच्या भगिनी गायिका उषा मंगेशकर या रुग्णालयात आल्या. सध्या आशाताई, उषाताई, आदिनाथ मंगेशकर त्यांची काळजी घेतायत. जर तब्येतीला आराम पडला तर डॉक्टर उद्या त्यांना डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. रुग्णालय भागातील परिस्थितीचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विराज मुळे यांनी.


Body:.


Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.