ETV Bharat / sitara

'पूर्वी'शिवाय नीलचे अजिबात 'लागे ना' मन, मेकअपच नवं गाणं लाँच

author img

By

Published : Jan 24, 2020, 9:40 AM IST

प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या 'मेकअप' सिनेमाच्या ट्रेलरला आणि 'गाठी गं' या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'पूर्वी' आणि 'नील'च्या दणक्यात संपन्न झालेल्या साखरपुड्यानंतर या सिनेमातील 'लागे ना' हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे.

lagena-man-song
मेकअपच नवं गाणं लाँच


मुंबई - 'लागे ना मन' या गाण्यात 'नील'ला 'पूर्वी' बद्दल 'त्या' खास भावना जाणवताना दिसत आहेत. नीलला क्षणाक्षणाला होणारा पूर्वीचा भास, ती सोबत नसतानाही त्याला जाणवणारा तिचा सहवास, प्रेमात पडत असल्याची होणारी जाणीव हे सगळं 'नील' सोबत होताना दिसत आहे. प्रेमात पडल्यावर केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी नील करतोय. पूर्वीचा पाठलाग, तिला लपून बघणे, चांगले दिसण्यासाठी होणारी धडपड करून पूर्वीचे लक्ष वेधण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न गाण्यातून दिसतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला साहील कुलकर्णीने स्वरबद्ध केले असून प्रेमात पडल्यावर निर्माण होणाऱ्या भावना वैभव देशमुख यांनी अगदी साजेशा शब्दात मांडल्या आहेत. गणेश पंडित लिखित दिग्दर्शित 'मेकअप' हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

lagena-man-song
मेकअपच नवं गाणं लाँच

सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन अ‌ॅपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.

lagena-man-song
मेकअपच नवं गाणं लाँच
Intro:मेकअप लागे ना गाणं लिंक -
https://www.youtube.com/watch?v=QmTSJkEAnkU&feature=youtu.be

प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या 'मेकअप' सिनेमाच्या ट्रेलरला आणि 'गाठी गं' या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'पूर्वी' आणि 'नील'च्या दणक्यात संपन्न झालेल्या साखरपुड्यानंतर या सिनेमातील 'लागेना' हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात 'नील'ला 'पूर्वी' बद्दल 'त्या' खास भावना जाणवताना दिसत आहेत. नीलला क्षणाक्षणाला होणारा पूर्वीचा भास, ती सोबत नसतानाही त्याला जाणवणारा तिचा सहवास, प्रेमात पडत असल्याची होणारी जाणीव हे सगळं 'नील' सोबत होताना दिसत आहे. प्रेमात पडल्यावर केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी नील करतोय. पूर्वीचा पाठलाग, तिला लपून बघणे, चांगले दिसण्यासाठी होणारी धडपड करून पूर्वीचे लक्ष वेधण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न गाण्यातून दिसतो.
ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला साहिल कुलकर्णीने स्वरबद्ध केले असून प्रेमात पडल्यावर निर्माण होणाऱ्या भावना वैभव देशमुख यांनी अगदी साजेशा शब्दात मांडल्या आहे. गणेश पंडित लिखित दिग्दर्शित 'मेकअप' हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.