ETV Bharat / sitara

रिंकु राजगुरूच्या 'मेकअप'साठी नेहा कक्कडने गायले मराठी गाणे

author img

By

Published : Jan 27, 2020, 4:47 PM IST

रिंकु राजगुरूच्या आगामी मेकअप सिनेमासाठी गायिका नेहा कक्कडने मराठी गाणे गायले आहे.

Neha Kakkar new song launched
नेहा कक्कडने गायले मराठी गाणे


'मेकअप' सिनेमाच्या ट्रेलरला आणि 'गाठी गं' या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता या सिनेमातील 'कसे निराळे हे करार प्रेमाचे' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील आघाडीची गायिका नेहा कक्कडने हे गीत मराठीत गायले आहे.

टोनी कक्कड यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला नेहा कक्कडने स्वरबद्ध केले असून मंगेश कांगणे यांनी हे गीत लिहिले आहे. प्रेमात दुखवल्या गेलेल्या भावना या गीतात मांडण्यात आल्या आहेत. या सपरेल गाण्याला चाहत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

गणेश पंडित लिखित दिग्दर्शित 'मेकअप' हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन अ‌ॅपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत.

'मेकअप' या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्या व्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.