ETV Bharat / sitara

नव्वदच्या दशकातील 'या' अभिनेत्रीसाठी ईशान बनला 'अ सूटेबल बॉय', रोमॅन्टिक फोटो व्हायरल

author img

By

Published : Dec 3, 2019, 10:06 AM IST

नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याच्यापेक्षा तब्बल २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा रोमॅन्टिक लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो.

Ishaan khattar romance with tabu in a suitable boy, first look out
नव्वदच्या दशकातील 'या' अभिनेत्रीसाठी ईशान बनला 'अ सूटेबल बॉय', रोमॅन्टिक फोटो व्हायरल

मुंबई - बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर हा सध्या त्याच्या आगामी 'अ सूटेबल बॉय' या वेबसीरिजमुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच या वेबसीरिजचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यामध्ये ईशान खट्टरची रोमॅन्टिक झलक पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याच्यापेक्षा तब्बल २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा रोमॅन्टिक लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो.

'अ सूटेबल बॉय' या सीरिजमध्ये ईशान एका कॉलेजमधील विद्यार्थ्याची भूमिका साकारत आहे. तर, तब्बू ही देहविक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. पाळण्यावर बसून तिच्या सौंदर्याचं निरीक्षण करणारा ईशान या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो.

हेही वाचा -थुकरटवाडीत अवतरली 'पानिपत'ची टीम, आशुतोष गोवारीकरांनी केलं अरविंद जगताप यांचं कौतुक

या वेबसीरिजमध्ये ईशान, तब्बू आणि राम कपूरसोबतच रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिझवी आणि माहिरा कक्कड मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये नासिरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह देखील दिसणार आहे.

ही वेबसीरिज पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, ईशान आणि तब्बूचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांमध्ये या सीरिजविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ईशान आपल्या वयाच्यापेक्षा जास्त असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे त्याची नेमकी भूमिका कशी असेल, ते ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

हेही वाचा -सदाशिवराव-पार्वतीबाईंच्या विवाह सोहळ्याची खास झलक, पाहा 'पानिपत'चं नवं गाणं

Intro:Body:

Ishaan khattar romance with tabu in a suitable boy, first look out

a suitable boy first look, a suitable boy series, Ishaan khattar romance with tabu, tabu in a suitable boy, ishan khattar in a suitable boy, a suitable boy webseries latest news

नव्वदच्या दशकातील 'या' अभिनेत्रीसाठी ईशान बनला 'अ सूटेबल बॉय', रोमॅन्टिक फोटो व्हायरल

मुंबई - बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर हा सध्या त्याच्या आगामी 'अ सूटेबल बॉय' या वेबसीरिजमुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच या वेबसीरिजचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यामध्ये ईशान खट्टची रोमॅन्टिक झलक पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याच्यापेक्षा तब्बल २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा रोमॅन्टिक लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो. 

'अ सूटेबल बॉय' या सीरिजमध्ये ईशान एका कॉलेजमधील विद्यार्थ्याची भूमिका साकारत आहे. तर, तब्बू ही देहविक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. पाळण्यावर बसून तिच्या सौंदर्याचं निरीक्षण करणारा ईशान या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो. 

या वेबसीरिजमध्ये ईशान, तब्बू आणि राम कपूरसोबतच रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिझ्वी आणि माहिरा कक्कड मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये नसिरूद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह देखील दिसणार आहे. 

ही वेबसीरिज पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, ईशान आणि तब्बूचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांमध्ये या सीरिजविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ईशान आपल्या वयाच्यापेक्षा जास्त असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे त्याची नेमकी भूमिका कशी असेल, ते ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यावरच समजेल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.