ETV Bharat / sitara

पाहा, सामंथाचा 'फॉर्म दुरुस्त' करातानाचा नवा व्हिडिओ

author img

By

Published : Jan 8, 2022, 12:59 PM IST

सामंथा रुथ प्रभूचा व्यायाम करीत असतानाचा एक व्हिडिओ सध्या फॉलोअर्सचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओत ती 'फॉर्म दुरुस्त करण्यावर' लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवरील तिच्या नवीन व्हिडिओंमध्ये, सामंथा गंभीर वेटलिफ्टिंग स्क्वॉट्समध्ये रमलेली दिसत आहे.

सामंथा वर्कआउट व्हिडिओ
सामंथा वर्कआउट व्हिडिओ

हैदराबाद (तेलंगणा) - अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाते. तिच्या व्यायामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही अभिनेत्री पुन्हा तिच्या 'फॉर्म'वर काम करत आहे.

100 किलोंहून अधिक वजन उचलण्यापासून ते अचाट स्टंट करण्यापर्यंत उत्साही असलेली सामंथा कठीण वर्कआउट करीत असते. इंस्टाग्रामवरील तिच्या नवीन व्हिडिओंमध्ये, सामंथा गंभीर वेटलिफ्टिंग स्क्वॉट्समध्ये रमलेली दिसत आहे. शनिवारी, सामांथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही व्हिडिओ शेअर केले ज्यामध्ये ती जुनैद शेखकडून प्रशिक्षण घेत असल्याचे दिसते. व्हिडिओ शेअर करताना, समांथाने लिहिले, "खाली जा किंवा घरी जा...माझा फॉर्म दुरुस्त करत आहे."

सामंथा वर्कआउट व्हिडिओ

या आठवड्याच्या सुरुवातीला, सामंथाने मानसिक सामर्थ्याचे महत्त्व आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडथळ्यांनंतर एक मजबूत व्यक्ती होण्याच्या तिच्या हेतूबद्दल सांगितले होते. तिने नागा चैतन्यसोबत घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, तिचे इंस्टाग्राम कोट्स तिच्या फॉलोअर्सकडून डीकोड केले जात आहेत आणि 'गुप्त' पोस्ट देखील हेडलाईन्स बनत आहेत.

कामाच्या आघाडीवर, सामंथा तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत गुंतली आहे. ज्यामध्ये एक हिंदी वेब सीरिज 'फॅमिली मॅन' फेम राज-डीके जोडीने तयार केली असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री सामंथाने तापसी पन्नूच्या आगामी प्रॉडक्शन व्हेंचरसाठी साइन अप केल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा - मृत्यूसाठी शुभेच्छा देणाऱ्या ट्रोलर्सना स्वरा भास्करचे सडेतोड उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.